दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
मिहीनतले, (त्या काळातील सिलोन) श्रीलंका या ठिकाणी सम्राट अशोकाचे सुपुत्र महास्थविर महा महेंद्र भारतामधुन येथे आले व राजा तिष्य व त्यांच्या अनेक नागरिकांना बौद्ध धम्माची दिक्षा देवून बौद्ध बनविले. महा महेंद्र यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थि धातु ठेवून त्यावर अति विशाल अशा पर्वतावर विशालकाय स्तुप निर्माण करण्यात आला. त्याचे दर्शन करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा शाखेच्या माध्यमातून श्रीलंका बौद्ध स्थल दर्शनाचे पर्यटन दिनांक 15 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 पर्यंत आयोजित करण्यात आले. या पर्यटना अंतर्गत बालाघाट, बैतुल, भोपाल, नागपुर, गोंदिया, यवतमाळ तसेच उत्तर प्रदेश राज्यातील असे एकुण 50 पर्यटक सामील झाले. मध्य प्रदेश दक्षिण राज्य शाखा अध्यक्ष आदरणीय चरण दास ढेंगरे यांच्या नेतृत्वाखाली लुंबिनी ट्रवेल्सचे आदरणीय भीमराव खोब्रागडे यांचे उत्कृष्ट आयोजन तसेच संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई व राष्ट्रीय सचिव व मध्य प्रदेश प्रभारी बी एच गायकवाड मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले.
आज दिनांक 17 डिसेंबर रोजी मिहींतले व सिगिरिया फोर्टचे यशस्वीपणे दर्शन करण्यात आले.
जगदीश गवई
राष्ट्रीय उपाध्यक्ष
केंद्रीय कार्यालय
मुंबई






No comments:
Post a Comment