Sunday, December 17, 2023

बोधिसत्वाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी हरेगाव येथे स्वाभिमान धम्मपरिषद

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ 

दिनांक: १६ डिसेंबर १९३९ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थळ: हरेगाव, शुगर फॅक्टरी ता. कोपरगाव,जि. अहमदनगर येथे झालेल्या परिषदेत  "न्याय्य हक्काआड सरकार आले तर बंड करा पण अन्याय सहन करू नका".असा त्यांनी स्वाभिमानी संदेश दिला.त्याचा सतत १९ वर्षापासून बोधिसत्व पदस्पर्शाच्या त्या पवित्र भुमीत सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वाभिमानी धम्म परिषदेचा कार्यक्रम व दहा दिवस अगोदर पासून सुरु असलेल्या बौध्दाचार्य -श्रामणेर प्रशिक्षण शिबिर व दोन उपासिका प्रशिक्षण शिबिरांचा सांगता समारंभ दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा: अहमदनगर (उत्तर) जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष आद. सुगंधराव ईंगळै यांच्या अध्यक्षतेखाली भव्य स्वरूपात यशस्वी पार पडला. 

सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून आद. वसंत पराड राष्ट्रीय सचिव,आद.राजेश पवार राष्ट्रीय सचिव,आद. अशोक केदारे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव व आद. डी. टी. सोनावणे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या अहमदनगर जिल्हा भुमीपुत्रांनी मार्गदर्शन केले.

त्या नंतर १० दिवस केंद्रीय शिक्षक म्हणून उपस्थित असलेले आद. सत्येंद्र तेलतुंबडे माजीअहमदनगर जिल्हा अध्यक्ष व सभाध्यक्ष आद. सुगंधराव ईंगळै याची भाषणे होउन कार्यक्रमाचा सरणंतयाने समारोप झाला.























No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...