Saturday, January 6, 2024

बौद्धाचार्य परीक्षेत 302 विद्यार्थी पास

   ===============================      

 भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक :अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन :  डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर 

============================================


मुंबई :- दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ( भारतीय बौद्ध महासभा) या धम्म संस्थेच्या वतीने मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्यातून श्रामणेर / बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर पुर्ण केलेल्या 521 पैकी 376 परीक्षार्थींची 19 परीक्षा केंद्रांवर लेखी व तोंडी परीक्षा दि. 05/11/2023 रोजी झाली .त्यामध्ये 80.32% विदयार्थी पास झाले आहेत. एकुण 302 परिक्षार्थी पास झाले असून, 74 परिक्षार्थी नापास झाले. 200 पैकी 174 मार्क मिळवून पालघर चे आयु. कुणाल अरुण जगताप व आयु. दिपक नाना कडलक यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, दुसरा आयु. सुमेध संजय साळवे 173 मार्क आणि तिसरा आयु. संजय पांडुरंग साळवे 170 मार्क मिळवून पटकावला आहे. 

या परीक्षेत प्रथम 5 क्रमांक पालघर जिल्हा शाखेने पटकावले असून, 

सहावा क्रमांक पालघर व नांदेड उत्तर जिल्हा शाखेने पटकावला आहे. 

सातवा क्रमांक ठाणे जिल्हा शाखा, तर आठवा व नववा क्रमांक पालघर जिल्हा शाखेने आणि दहावा क्रमांक मुंबई प्रदेश शाखेने पटकावला आहे .

मुंबई प्रदेश शाखेचे 54 पैकी 53,

नवी मुंबई शाखेचे 22 पैकी 22, 

ठाणे जिल्हा शाखेचे 46 पैकी 39,

पालघर जिल्हा शाखेचे 32 पैकी 32,

 सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे 6 पैकी 6,

यवतमाळ पश्चिम जिल्हा शाखेचे 10 पैकी 8, 

अकोला जिल्हा शाखेचे 20 पैकी 17, 

 चंद्रपूर पूर्व जिल्हा शाखेचे 7 पैकी 7,

नांदेड उत्तर जिल्हा शाखेचे 23 पैकी 16, 

पुणे पश्चिम जिल्हा शाखेचे 26 पैकी 18, 

 सातारा पूर्व जिल्हा शाखेचे 12 पैकी 11, 

परभणी उत्तर जिल्हा शाखेचे 19 पैकी 13,  

हिंगोली जिल्हा शाखेचे 16 पैकी 6

,जळगाव पूर्व जिल्हा शाखेचे 16 पैकी 15, 

रायगड उत्तर जिल्हा शाखेचे 8 पैकी 5,

 नाशिक पूर्व जिल्हा शाखेचे 7 पैकी 7, 

नाशिक पश्चिम जिल्हा शाखेचे 25 पैकी 9,  

रायगड दक्षिण जिल्हा शाखेचे 13 पैकी 10, 

 छ. संभाजीनगर ( औरंगाबाद) जिल्हा शाखेचे 14 पैकी 8, 

असे एकूण 302 परिक्षार्थी पास झाले आहेत. या सर्व यशस्वी बौद्धाचार्यांचे संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद.डाॅ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी अभिनंदन केले आहे अशी एस.के.भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष / मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख )व एस एस वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख) यांनी माहिती दिली.

























No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...