☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर
ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर
☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️
मुंबई : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी / राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डाॅ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालयाचे प्रमुख आद. एस. के. भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि. ०४/०१/२०२४ रोजी डाॅ. आंबेडकर भवन, गोकुळदास पास्ता रोड, दादर येथे केंद्रीय प्रशिक्षण विभाग ,केंद्रीय महिला विभाग ,महाराष्ट्र राज्य महिला शाखा आणि मुंबई प्रदेश महिला शाखा पदाधिकारी यांच्या संपन्न झालेल्या महत्त्वपुर्ण बैठकीनुसार खालील निर्णय घेण्यात आले आहेत.
१) श्रामणेरी / बौद्धाचार्या धम्म प्रशिक्षण शिबिरासाठी महाराष्ट्रातील ५८ जिल्हा शाखा व मुंबई प्रदेशातील ६ झोन शाखांमधून प्राप्त झालेल्या अर्जातून श्रामनेरी-बौद्धाचार्या शिबिर घेण्याचे ठरले.
२) प्रामुख्याने सन २०१९ पर्यंत केंद्रीय शिक्षिका झालेल्या महिलांचे माता रमाई जयंती निमित्त चैत्यभुमी येथे दि. ०२/०२/२०२४ ते दि. ११/०२/२०२४ या कालावधीत श्रामणेरी - बौद्धाचार्या शिबिर घेण्यात येणार आहे.(शिबिरार्थीची यादी सोबत जोडली आहे)
३)उर्वरित प्राप्त अर्जातील सन २०२० पासून केंद्रीय शिक्षिका झालेल्या महिलांना माता रमाई स्मृती दिन ( २७/०५/२०२४)निमित्त चैत्यभुमी येथे श्रामणेरी -बौद्धाचार्या शिबिर घेण्यात येईल.
४)प्राप्त अर्जातील केंद्रीय शिक्षिका नसलेल्या मात्र उपासिकांचे चैत्यभुमी येथे श्रामणेरी शिबिर घेण्यात येईल.
५)शिबिराची प्रवेश फी फक्त ₹.२५०/- असून भरणा गुगल पे द्वारे केंद्रीय प्रशिक्षण विभाग सचिव आयुष्य मानिनी सुनंदाताई पवार( मोबाईल नंबर 93244313894 )किंवा आयु. अनिल मनोहर (मोबाईल नंबर 7083910856 ) यांना पाठवावे आणि दि. 02/02/2024 रोजी दुपारी 2.30 वाजता चैत्यभुमी येथे 10 दिवसाच्या शिबिरासाठी सर्व आवश्यक साहित्यासह, मुंडन करुन उपस्थित रहावे.
नमो बुध्दाय!जयभिम!!जय संविधान!!!
आपले धम्म बंधु / धम्म भगिनी,
सुषमाताई पवार,
राष्ट्रीय उपाध्यक्षा/ केंद्रीय महिला विभाग प्रमुख.
सोपान वानखडे,
राष्ट्रीय सचिव/ केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया
दि. 6/1/2024
No comments:
Post a Comment