दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया
भारतीय बौद्ध महासभा
संस्था नोंदणी क्रमांक 32 27 विश्वस्त नोंदणी क्रमांक 982 एफ मुंबई .
संस्थापक बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
राष्ट्रीय संरक्षक आद. महाउपासिका मीराताई आंबेडकर.
ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरेश रावलीया.
ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन एडवोकेट सुभाष जोंजाळे साहेब.
राष्ट्रीय कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद. डॉ. भीमराव आंबेडकर साहेब
=====================================
जिल्हा पुणे पश्चिम रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी आंबा अंबिका अंबालिका व भुत बुद्ध लेणी जुन्नर येथे वंदना सुत्तपठण घेऊन समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेंश पवार गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले.आदरणीय राजेश पवार गुरुजी यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्त्व आपल्या प्रवचनातून सांगितले. तसेच संस्थेचा कामकाज याविषयी माहिती सांगितली .
भारत बौद्धमय करण्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धर्म हा ग्रंथ लिहिला आहे. आजच्या भिक्खू संघाच्या रचनेत आणि त्यांच्या ध्येय उद्दिष्टांमध्ये बदल केले पाहिजे यासाठी बाबासाहेबांनी 'मी संघाला शरण जाणार नाही' असे म्हटले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पुणे पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ तर सूत्रसंचालन सरचिटणीस भगवान शिंदे यांनी केले .
आभार प्रदर्शन संस्कार उपाध्यक्ष अशोक कडलक यांनी मानले
या वेळी जिल्ह पदाधिकारी, तालुका जुन्नर, आंबेगाव, खेड दक्षिण खेड उत्तर, मावळ दक्षिण मावळ उत्तर, देहूरोड या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अधिकारी पदाधिकारी सैनिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जुन्नर तालुक्याने विशेष परिश्रम घेतले तर उर्वरित आंबेगाव खेड या तालुक्यांनी सुद्धा चांगले सहकार्य केले.
ज्या निष्ठावंतानी या कार्यक्रमात भाग घेतला त्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार.
आजच्या कार्यक्रमाची काही क्षण चित्रे खालील प्रमाणे आहेत.
No comments:
Post a Comment