A large number of soldiers of Samata Sainik Dal and office bearers of The Buddhist Society of India attended the flag hoisting program organized on the occasion of 74th Republic Day.

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दल यांच्या वतीने चैत्यभूमी दादर येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवसाच्या अथक प्रयत्नाने भारताचे संविधान तयार केले. या संविधानाच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित ठेवण्याचे कठीण कार्य संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे.
म्हणून ज्याप्रमाणे भारताचा स्वातंत्र्य दिन महात्मा गांधी यांना समर्पित केला जातो. त्याचप्रमाणे प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित होणे आवश्यक आहे .असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी चैत्यभूमी दादर येथील 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रतिपादन केले आहे.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरीश रावलिया साहेब यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास भन्ते धम्म प्रिय व भिक्खु संघ आणि आदरणीय एस .के .भंडारे साहेब (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर ) यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आदरणीय उत्तम मगरे साहेब (मुंबई प्रदेश अध्यक्ष ) यांनी मान्यवरांचे स्वागत केले व आद. रविंद्र गवई साहेब (मुंबई प्रदेश सरचिटणीस ), यांनी सूत्रसंचालन केले.
ध्वजारोहण कार्यक्रमाचे संचालन आद. अशोक कदम (असि.स्टाफ ऑफिसर ) व आद.डी .एम. आचार्य ( हेड क्वार्टर सचिव ) यांनी केले .
74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास समता सैनिक दलाचे सैनिक आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment