Online Prelims Exam 2023 will be held for devotees who want to take admission in Central Teacher Training Camp
The online examination was conducted on 11 January 2023 at Ambedkar Bhavan Dadar under the guidance of Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb, National Working President of The Buddhist Society of India.
The said examination was conducted for National Officers, Maharashtra State Branch Officers, Mumbai State Branch Officers, Samata Sainik Dal Officers and Dhammayan Monthly Section Officers.
Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar, Honorable Captain Praveen Nikhade and Honorable S.K. After Bhandare Saheb reviewed this online examination, it was decided that the trained devotees appearing for the Central Teacher Training Camp should be conducted online pre-examination in the same manner.
Central teacher training camp for trained worshipers will be conducted at Chaityabhoomi Dadar from 2nd February 2023 (Subhedar Ramji Baba Memorial Day) to 7th February 2023 (125th birth anniversary of Mata Ramai).
The preliminary examination of the trained devotees taking admission in the said Central Teacher Training Camp will be held online on 19th January 2023 between 7.30 PM and 7.50 PM.
Head of Central Training Department Hon'ble S.S. Mr. Wankhade and Deputy Head of Central Training Department Hon'ble Supriyatai Kasare have issued a circular regarding this examination.
Programme of BSI is a small effort to publicize the activities of the institute through this blog.
===================================
केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उपासिकांची होणार ऑनलाईन पूर्व परीक्षा 2023
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 11 जानेवारी 2023 रोजी आंबेडकर भवन दादर येथे ट्रायल बेसवर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.
सदर परीक्षा राष्ट्रीय पदाधिकारी महाराष्ट्र राज्य शाखेचे पदाधिकारी मुंबई प्रदेश शाखेचे पदाधिकारी समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि धम्मयान मासिक विभागावर काम करणारे पदाधिकारी यांची परीक्षा घेण्यात आली.
आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब, आदरणीय कॅप्टन प्रवीण निखाडे साहेब आणि आदरणीय एस .के. भंडारे साहेब यांनी या ऑनलाइन परीक्षेचा आढावा घेतल्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की, केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरास बसणाऱ्या प्रशिक्षित उपासिकांची याच पद्धतीने ऑनलाईन पूर्व परीक्षा घेण्यात यावी.
दिनांक 2 फेब्रुवारी 2023 (सुभेदार रामजी बाबा स्मृतिदिन) ते दिनांक 7 फेब्रुवारी 2023 (माता रमाई ची 125 वी जयंती) या कालावधीत चैत्यभूमी दादर येथे प्रशिक्षित उपासिकांसाठी केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे.
सदर केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरास प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षित उपासिकांची पूर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिनांक 19 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 7.30ते 7. 50 या वेळेत होणार आहे.
केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख आदरणीय एस .एस. वानखडे साहेब आणि केंद्रीय प्रशिक्षण विभाग उपप्रमुख आदरणीय सुप्रियाताई कासारे यांनी या परीक्षे संदर्भात परिपत्रक जारी केले आहे.
प्रोग्राम ऑफ बीएसआय या ब्लॉगच्या माध्यमातून संस्थेच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment