दिनांक 4 फेब्रुवारी 2023 रोजी चैत्यभूमी दादर येथे केंद्रीय शिक्षिका शिबिरात आयु . राजेश पवार : राष्ट्रीय सचिव ( महाराष्ट्र, पंजाब व हरियाणा राज्याचे प्रभारी) यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व तिचे कार्य हा विषय शिकविला .
या विषयाची माहिती पुढील प्रमाणे दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रहादेशातील रंगुन येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत दि.४डिसेंबर१९५५ रोजी सहभागी झाले. तिथे त्यांनी 'बुद्धिस्ट मुव्हमेंट इन इंडिया' अर्थात 'भारतातील बौद्ध चळवळ' या विषयावर सविस्तर भूमिका विषद केली. भारतात परतल्यानंतर त्यांनी 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' या धम्मसंस्थेची स्थापना केली. स्वतः या संस्थेची घटना, अध्यक्षीय लोकशाही पद्धती नुसार लिहिली. ही संस्था 'सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६०' अन्वये नोंदणीकृत केली. दि. ४ मे १९५५ रोजी रजिस्ट्रेशन क्रमांक ३२२७ मिळाला. तसेच ही संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी 'मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट १९५० अन्वये धर्मादाय आयुक्तांकडे पंजीकृत केली. तिचा नोंदणी क्रमांक ९८२ (एफ) मुंबई दि. १८ मे १९५५ रोजी प्राप्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना दि. ४ मे. १९५४ रोजी केली. भारतीय बौद्ध महासभा स्थापन झाली तेव्हा धर्मांतर झाले नव्हते. याचाच अर्थ त्यांचा पुर्णतः बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्धार झाला होता. दि. ५ ऑगस्ट, १९५६ रोजी सोहमलाल शास्त्री यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, "बौद्ध संस्कृतीचे पूर्नजीवन करणे व सर्व भारत बौद्धमय करणे हे माझे उद्धिष्ट आहे." म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतामध्ये बौद्ध संस्कृती पुन्हा रूजवायची होती. आणि त्यासाठी एखाद्या संघटनेची, संस्थेची गरज होती. म्हणून त्यांनी भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची स्थापना केली. बाबासाहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे पहिले अध्यक्ष ठरले. त्यानंतर त्यांनी दि. १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी नागवंशीय लोकांचे शहर असलेले, नागसंस्कृतीचे केंद्र असलेले आणि महार लोकाची संख्या संघटीत बहुसंख्या असलेला प्रदेश नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
दोन कायद्या अंतर्गत रजिस्टर्ड केलेल्या 'दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया' या धम्मसंस्थेच्या घटनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खालील १० ध्येय आणि उद्दिष्ट्ये नमूद केली आहेत.
१) भारतात बौद्ध धम्माचा प्रसार-प्रचार करणे.
भारतात बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे हे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेचे मुख्य ध्येय आहे. या मुख्य उद्देशापायी या संस्थेची निव ठेवण्यात आली आणि आजवर ह्या संस्थेची भरभराट सुरू आहे. ह्या संस्थेची भरभराट व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न होय आणि त्यांनीच ह्या संस्थेची उद्दिष्ट्ये ठरविली. आज भारतभर ह्या संस्थेचे कार्य अविरत सुरू आहे. आज केंद्रीय शिक्षक किंवा शिक्षिका बनून ह्या संस्थेअंतर्गत विविध शिबिरातून धम्मानुयायी लोक निर्माण होत आहे...
२) बुद्ध वंदनेसाठी विहारे बांधणे .
३) धार्मिक व शास्त्रीय विषयांसाठी शाळा व महाविद्यालये स्थापन करणे.
बौद्ध धम्म हा खरे तर धम्म दीक्षेपर्यंत पूर्णतः लोप पावलेला होता.. अशा अभावग्रस्त काळात धम्माचे बीज पेरणे महत्वाचे कार्य होय. हे बीज लावायचे तर तशी शिकवण द्यावी लागेल. ती शिकवण देणारे आपलेच शाळा, महाविद्यालय हवे. तरच बालमनावर, किशोरवयीन विद्यार्थ्यांवर धम्म आणि तर्कशुद्ध शास्त्र, विज्ञान त्यांच्या मनी उतरविता येईल. म्हणून शाळा आणि महाविद्यालये स्थापन करणे हे देखील द्रष्टेपणाने घेतलेले ध्येय होय.
४) अनाथाश्रम, दवाखाने आणि सहाय्य केंद्र काढणे .
बौद्ध धम्मीय लोक हे मुळातच वंचित घटकातील होय. १९५६ च्य धम्मदीक्षेनंतर काही जरा बदल झाला. परंतु जवळपास संपूर्ण समाज गरिबी, दारिद्र्यात खितपत पडलेला आहे. तेव्हा त्यांच्याकरिता आरोग्यसेव पुरविणे, अनाथाश्रम काढणे हे अगत्याचेच होय. सहाय्य केंद्रे काढलीत तर गरजू व्यक्तिंपर्यंत मदत पोहचविता येईल आणि आपले हवालदिल बांधवांना धीर देता येईल. यासाठीत खरे तर दवाखाने आणि सहाय्य केंद्रे काढायचे बाबासाहेबांनी हेरले आणि हे संस्थेचे ध्येय ठरविले.
५) बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराकरीता धम्म प्रचारक निर्माण करणे, बौद्ध शिक्षण शिबीरे चालविणे.
६ ) धर्माचा तुलनात्मक अभ्यास करण्यास प्रोत्साहन देणे .
बौद्ध धर्माची महती तेव्हाच लक्षात येऊ शकते जेव्हा अनेक धर्मासोबत तुलनात्मक अभ्यास करता येईल. कारण बौद्ध धर्म हा इतर धर्मासारखा कर्मकांड, दैववाद, अंधश्रद्धा आणि भ्रम पसरवित नाही तर तो जीवनमार्ग होय. मात्र हे प्रत्यक्ष गळी उतरावयाचे असेल तर बौद्ध धर्मासोबत इतर धर्माचा देखील तुलनात्मक अभ्यास होईल आणि जेव्हा तुलनात्मक अभ्यास होतो. तेव्हा बौद्ध धर्माचे वेगळेपण आणि उपयोगिता जास्त मनी भरते. सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास होतो तेव्हाच बौद्ध धर्माचे वेगळेपण आणि उपयोगिता जास्त मनी सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करण्याकडे जास्त भर द्यावा. हेच त्या मागचे खरे गमक होय. त्यामुळे ह्या संस्थेने धम्माच्या तुलनात्मक अभ्यासाला प्रोत्साहन द्यावे हे एक महत्वाचे ध्येय होय .
७) बौद्ध वाङ्मयाचे प्रकाशन हाती घेणे आणि सर्वसाधारण माणसापर्यंत बौद्ध धम्माची खरी शिकवण पोहचविण्यासाठी हस्तपत्रके आणि पुस्तिका वाटणे .
हे उद्दिष्ट्य जर पूर्ण करण्यासाठी आपण धडपडलो तर निश्चितच छोट्या छोट्या हस्तपुस्तिका किंवा हस्तपत्रके गल्लीबोळामध्ये म्हणजेच शेवटच्या तळागाळातल्या विविध जाती-धर्मात अडकलेल्या, पिचलेल्या, दबलेल्या पाड्या-बेड्यावर देखील असलेल्या माणसांपर्यंत ही बुद्धाची कल्याणकारी शिकवण पोहचविता येईल.
आज आपण बघतो की हेच कार्य ख्रिस्ती लोक घरोघरी जाऊन बायबलच्या छोट्या प्रति किंवा काही येशूच्या गोष्टी घरापर्यंत निशूल्क देतात. त्यानेच त्या गोष्टीतून आपसूकपणे ख्रिस्तीधर्म अवगत करतात. हीच बाब आपण लक्षात घेऊन बौद्ध वाङ्मयातील विविध छोट्या-छोट्या पुस्तिका काढाव्यात. त्यानेच बौद्धकालीन तत्वे गोष्टीरूपाने येतील आणि बुद्धिझम जनमाणसात सर्वसाधारण लोकांपर्यंत पोहचविणे सोपे होइल हे ध्यानात ठेवूनच अतिशय महत्वाचे हे ध्येय होय, की बौद्ध वाङ्मयाचे प्रकाशन करणे आणि हस्तपत्रके किंवा छोटेखानी पुस्तिका वाटणे होय.
८) गरज पडल्यास भिक्षूंचा नवा संघ निर्माण करणे
बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी दोन संघ खास प्रभावशाली आहेत. एक उपासक उपासिका संघ आणि दुसरा भिक्षु संघ .उपासक, उपासिका ह्या गृहस्थी जीवनाच्या रहाटगाड्यात असल्याने त्या दुर्लक्षित करतात. मात्र त्यामुळेच ही जबाबदारी पूर्णपणे भिक्खू संघावर येऊन पडलेली दिसते. भिक्षु संघ जर ज्ञानी असेल, शीलाचे पालन करणारा असेल तर त्याचा सामान्य उपासकांवर निश्चितच परिणाम होतो. आज प्रशिक्षित भिक्षुची फारच गरज आहे. भिक्षुचा दर्जा वाढविण्याची अतिशय आवश्यकता आहे. भिक्षु म्हटले की, ते धम्मधर, सदाचारी, शीलवान असलेच पाहिजे. त्यांना प्रशिक्षण देवून अधिक समाजाभिमुख बनविणे ही काळाची गरज होय. त्यामुळे गरज पडल्यास भिक्षूंचा नवा संघ निर्माण करण्याची निश्चितच आवश्यकता आहे. ही आवश्यकताच नाही तर ती निकड आहे. समाजाला वठणीवर आणण्यासाठी तेवढ्याच ताकदीचा धम्मबल प्राप्त असणारा भिक्षु हवा असतो. असा भिक्षु निर्माण करावा लागतो. योग्य प्रशिक्षणाने ते शक्य आहे. म्हणूनच प्रसंगी नवा भिक्षु संघ निर्माण करण्याचे देखील एक महत्वाचे ध्येय आहे.
९) बौद्ध धम्माच्या प्रचारार्थ प्रकाशनाचे कार्य पार पाडण्याच्या हेतूने मुद्रणालये चालविणे .
बौद्ध साहित्य हे पालि भाषेत आहे. बौद्ध धम्माला समजून घ्यायचे असेल तर मूळ पालि साहित्याचा अभ्यास करावाच लागेल. हे साहित्य तळागाळातल्या शेवटच्या माणसांपर्यंत जर पोहचवायचे असेल तरच आपल्याला प्रकाशन करावे लागेल. अनुवाद करून घ्यावा लागेल आणि मुलांकरीता तर वेगवेगळी रंगीबेरंगी चित्र असणारी पुस्तके म्हणजे वयोगट बघून त्यांना बौद्ध धम्म टिकविण्याची योग्य ते पाऊल उचलावे लागेल. त्यानेच खरे तर बौद्ध धम्म फोफावेल आणि आपले स्वतः चे प्रकाशन असेल तर आपल्याला ह्या कामाला गती देता येईल. मुद्रणालय, प्रकाशन संस्था ह्या मोठ्या प्रमाणात साहित्य काढण्यासाठी हवेतच. जर का आपल्याकडे ही साधनं नसतील तर आपण बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करूच शकत नाही. हा व्यापक दृष्टीकोन आणि पण असल्यामुळे बाबासाहेबांनी साहित्य मोठ्या प्रमाणात बाहेर येईल आणि बौद्ध धम्म तळागाळातील प्रत्येक समाज बांधवांपर्यंत पाहचेल आणि त्यामुळेचधर्मा-धर्माचा विचार स्वीकार आपसूनकच होईल आणि बुद्ध तत्वज्ञान हे सर्वांना ज्ञात होईल. त्यामुळेच ह्या ध्येयाला देखील महत्व देण्यात आले आहे.
१०) बंधुभाव संवर्धन आणि कार्यातील एकजूट यासाठी भारतीय बौद्धांचे मेळावे आणि धम्म परिषदा भरविणे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'जनता' पाक्षिकाचे नामांतर दि. ४ /२/१९५६ रोजी 'प्रबुद्ध भारत' असे केले. भारतातील बौद्धांसाठी 'बुद्ध पूजा पाठ' ही पुस्तिका डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दि. २४ फेब्रुवारी १९५६ रोजी पाली भाषेत लिहून, गाथांचा मराठी अनुवाद सुद्धा त्यात लिहिला. बुद्ध जयंती निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटीश ब्रॉड कास्टींग (बी.बी.सी.) लंडन वर 'मला बौद्ध धम्म का पसंत आहे.' या विषयावर दि. १२ मे १९५६ रोजी तर्कशुद्ध भाषण दिले.
दिल्ली येथील जाहीर समेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'धम्म आणि गीता' या विषयावर दि. १० जून १९५६ रोजी तुलनात्मक विश्लेषण केले. धम्मदीक्षा घेण्यासाठी शुभ्र वस्त्र परिधान करून नागपूरच्या नाग भूमीवर अशोका विजयादशमीला येण्याचे जाहीर आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि.२३ सप्टेंबर १९५६ रोजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन व जाहीर पत्रक काढून देशभरातील जनतेला केले.
पुज्य भन्ते महास्थवीर चंद्रमणी यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी दि. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, नागपूर जिल्हा शाखेच्या धम्मपीठावर स्वतः धम्मदीक्षा घेतली, त्यानंतर २२ कागदावर लिहिलेल्या २२ प्रतिज्ञा, डोळ्यावरील चष्मा काढून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जमलेल्या ५ लाख जनसमुदायाकडून जाहीरपणे वदवून घेतल्या. मग त्यांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. हे जगातील सर्वात मोठे धर्मातरण ठरले. तसेच तथागत भगवान बुद्ध व चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या नंतर हे धर्मांतर तिसरे विश्व विख्यात 'धम्म चक्र प्रवर्तन' ठरले. एकाने - दर एकाला धम्मदीक्षा देण्याचा अधिकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व उपस्थितांना दिला.
पुढील धम्मदीक्षेचा भव्य सोहळा मुंबईत घेण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाहीर केले. परंतु अल्पावधीतच त्यांचे दिल्ली येथे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले . त्यांचा अंत्यविधी दादर पश्चिम येथे चौपाटीवर दिनांक 7 डिसेंबर 1956 रोजी करण्यात आला. त्यांच्या अंत्यदर्शनाला जमलेल्या दहा लाख अनुयायांना पूज्य भदंत डॉक्टर आनंद कौसल्यायन यांनी धम्मदीक्षा दिली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर भारतीय बौद्ध महासभेची जहांगीर हॉल मुंबई येथे दिनांक ३ जानेवारी १९५७ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सुपुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची भारतीय बौद्ध महासभेच्या अध्यक्ष पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सुपुत्र यशवंतराव यांना सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर या नावाने देखील संबोधले जाते. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत देशभर दौरे करून हजारो लोकांना बौद्ध बनवले. थायलंड मधील बँकॉक शहरात संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेत दिनांक २४ नोव्हेंबर १९५८ रोजी भैय्यासाहेब आंबेडकर सहभागी झाले होते. या धम्म परिषदेत विविध बौद्ध राष्ट्रातून सहभागी झालेल्या प्रतिनिधींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ,'बुद्धा अंड हीज धम्मा ' हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेब आंबेडकरांनी सप्रेम भेट देऊन बौद्ध धम्माचा जगभर प्रसार करण्याचा एक कुशल प्रयत्न केला.
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७५ व्या जयंती दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्म ठिकाण महू येथून ते दादर चौपाटी पर्यंत भीम ज्योत काढली. या धम्मप्रचारात जमा झालेल्या धम्मदानातून भैय्यासाहेब आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यविधीच्या जागेवर यांचे चैत्यस्मारक तयार केले. चैत्य स्मारकालाच चैत्यभूमी या नावाने संबोधले जाते.
बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी भैय्यासाहेब आंबेडकरांनी दिनांक 8 ऑक्टोबर 1967 रोजी चक्र प्रवर्तन दिन पूज्य भंते यु वज्रबोधी यांच्याकडून श्रामनेर प्रवचजा घेतली. 'पंडित काश्यप' या प्रवज्जित नावाने भैय्यासाहेब आंबेडकरांनी धम्मज्ञान व संघज्ञान आत्मसात केले.
भारतीय बौद्ध महासभेची एकूण आठ अधिवेशने झाली आहेत.
पहिले अधिवेशन
दिनांक १७ सप्टेंबर १९७७ रोजी भैय्यासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर दिनांक २ ऑक्टोबर १९७७ रोजी सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सर्वसाधारण सभेत तत्कालीन सरचिटणीस आयुष्यमान ज.वि. पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुनबाई व भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या धर्मपत्नी आयुष्यामती मीराताई आंबेडकर यांच्या नावाची जाहीर सूचना मांडली. सर्वांचे अनुमोदन मिळाल्यावर मीराताई आंबेडकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.
दुसरे राष्ट्रीय अधिवेशन
भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन नागपुर येथील अंबाझरी मैदानात दिनांक 26 27 व 28 डिसेंबर 1980 रोजी मीराताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. या अधिवेशनात एकूण 24 ठराव सर्वांमध्ये पारित करण्यात आले. तसेच बौद्ध जीवन संस्कार पाठाची नवीन आवृत्ती या अधिवेशनात प्रकाशित करण्यात आली.
दिनांक १४,१५ व १६ मे १९८६ रोजी आंबेडकर भवन दादर येथे तीन दिवसीय 'भिक्खू परिषद' आयोजित करण्यात आली होती. या भिक्खू परिषदेचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या भिक्खू संघाचे संघनायक पूज्य भंते आनंद मित्र महाथेरो (कोलकत्ता) यांनी केले.
संघनायक महाथेरो आनंद मित्र (कोलकत्ता) यांच्या शुभहस्ते दिनांक १६ मे १९८६ रोजी भिक्खू संघाच्या वतीने आदरणीय मीराताई आंबेडकर यांना 'महाउपासिका' उपाधि देऊन गौरविण्यात आले.
तिसरे राष्ट्रीय अधिवेशन
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन महाउपासिका आदरणीय मीराताई आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १८ व १९ मार्च १९८९ रोजी डॉक्टर आंबेडकर भवन राणी झाशी मार्ग दिल्ली येथे घेण्यात आले. या अधिवेशनात 24 मागण्यांचे ठराव पारित करण्यात आले. काही महत्त्वाचे ठराव असे आहेत.
बुद्धगया महाबोधी विहाराचा ताबा बौद्धांकडे देणे.
बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा करणे .
संसदेच्या हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र लावणे.
संसद भावना समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारणे .
पोस्टाच्या तिकिटावर व नाण्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा छापने.
सर्व बौद्ध लेण्या, गुंफा, चैत्य यांचे संरक्षण व संवर्धन करणे.
चौथे राष्ट्रीय अधिवेशन.
खंडित झालेल्या धम्मयान मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.
प्रत्येक शाखेत चार विभाग कार्यरत राहतील असे ठरविण्यात आले.
संस्कार विभाग ,प्रचार व पर्यटन विभाग ,महिला विभाग व संरक्षण विभाग असे चार विभाग कार्यरत राहतील असे ठरविण्यात आले.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्थापन केलेले समता सैनिक दल स्वतंत्र न ठेवता भारतीय बौद्ध महासभेचा संरक्षण विभाग म्हणून कार्य करेल असा महत्त्वपूर्ण निर्णय या अधिवेशनात घेण्यात आला.
समता सैनिक दलाच्या 'कमांडर इन चीफ 'या प्रमुख पदावर भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराता आंबेडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पाचवे राष्ट्रीय अधिवेशन
भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय, राज्य, जिल्हा, तालुका, ग्राम, वॉर्ड इत्यादी स्तरावर कामकाज ज्या घटना व नियमावली नुसार चालते त्या कामकाज व नियम उपविधी या पुस्तकाचे दिनांक २१ मार्च २००० रोजी दादर येथे माउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या हस्ते सर्वसाधारण सभेत प्रकाशन करण्यात आले.
दिनांक १९ ऑगस्ट २००० रोजी चैत्यभूमी दादर येथे अखिल भारतीय बौद्धाचार्य परिषद संपन्न झाली. या परिषदेत बौद्धाचार्यांची आचारसंहिता सर्वांनुमते ठरविण्यात आली.
दिनांक २० ऑगस्ट २००० रोजी चैत्यभूमी दादर येथे अखिल भारतीय केंद्रीय शिक्षक शिक्षिका परिषद संपन्न झाली. या परिषदेत केंद्रीय शिक्षक शिक्षिका यांची आचारसंहिता ठरवण्यात आली.
सहावे राष्ट्रीय अधिवेशन.
सातवे राष्ट्रीय अधिवेशन.
आठवे राष्ट्रीय अधिवेशन.
.



No comments:
Post a Comment