Tuesday, March 21, 2023

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाप्रमाणे येणाऱ्या काळात समता सैनिक दलाची ताकद सामाजिक व राजकीय क्षेत्रात उभा करावी लागेल : डॉ. भीमराव य आंबेडकर

  


  डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या काळाप्रमाणे येणाऱ्या काळात समता सैनिक दलाची ताकद सामाजिक व राजकीय क्षेत्रात उभी करावी लागेल व समता सैनिक दलात किती ताकद आहे हे शाहीफेक प्रकरणामुळे दाखविले असल्याचे प्रतिपादन समता सैनिक दलाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथील पिंपरी -चिंचवड येथे दि.19 मार्च 2023 रोजी आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ.भीमराव यशवंत आंबेडकर  राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांनी केले. 

डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांनी  हेलिकॉप्टरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व उपस्थित हजारो जनतेवर पुष्पवृष्टी  केली. त्यांच्या सोबत  समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर व राष्ट्रीय उपाध्यक्ष एस .के .भंडारे ,समता सैनिक दलाचे विजय धर्मा ओहोळ,दिनेश बनसोडे  हे होते. 

या कार्यक्रमास असिस्टंट स्टाफ ऑफिसर व  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष  भिकाजी कांबळे,मेजर जनरल पी .एस. ढोबळे आणि पुण्यातील  मेजर सुरेश भालेराव,मेजर विनोद कांबळे,मेजर राजरतन थोरात,मेजर मल्हारी लोंढे,मेजर अनिल कांबळे,मेजर किरण आल्हाट इत्यादी उपस्थित होते. 

 कार्यक्रमाचे आयोजन  मनोज गरबडे, आकाश इजगज आणि त्यांचे सहकारी यांनी पिंपरी चिंचवड युनिट च्या वतीने केले होते.

 या प्रसंगी महापुरुषांच्या सन्मानार्थ  झालेल्या शाहीफेक प्रकरणात सक्रिय सहभाग / पाठिंबा दर्शविल्या बद्दल आंबेडकरी  योद्धा म्हणून डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते  सन्मानपत्र  देऊन गौरविण्यात आले. मनोज गडबडे आणि त्यांचे सहकारी यांना मदत करणारे सुमारे  300  वकील ,विविध संघटना ,राजकीय पक्ष , व्यक्ती असे सुमारे दहा हजार मान्यवरांना गौरविण्यात आले.

 प्रथम समता सैनिक दलाच्यावतीने 130 अधिकारी / सैनिक यांची डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली .त्यानंतर बाल सैनिकांनी डॉ भीमराव आंबेडकर यांना जनरल सलामी दिली. 

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या ठिकाणी समता ग्रंथालयाचे उदघाटन डॉ भीमराव आंबेडकर साहेब यांनी केले. डॉक्टर भीमराव आंबेडकर साहेब,सर्व सैनिक  आणि उपस्थित असलेले हजारो जनतेने सामुहिक भारतीय संविधाना च्या प्रस्ताविकेची शपथ घेण्यात आली.

 या कार्यक्रमास महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.







The strength of the Samata Sainik Dal will have to be raised in the social and political field in the coming times like the time of Dr. Babasaheb Ambedkar: Dr. Bhimrao and Ambedkar

The strength of Samata Sainik Dal will have to be raised in the social and political spheres in the coming times like the time of Dr. Babasaheb Ambedkar and the Shahifek case has shown the strength of Samata Sainik Dal on the occasion of the 96th anniversary of Samata Sainik Dal at Pimpri-Chinchwad in Pune. In a grand program organized on 19 March 2023, Dr. Babasaheb Ambedkar's grandson National President of Samata Sainik Dal. Bhimrao Yashwant Ambedkar National Working President, The Buddhist Society of India.

Dr. Bhimrao Yashwant Ambedkar showered flowers on Dr. Babasaheb Ambedkar statue and thousands of people present from a helicopter. Along with him, Staff Officer of Samata Sainik Dal and National Vice President S. K. Bhandare, Samata Sainik Dal Vijay Dharma Ohol, Dinesh Bansode.

Assistant Staff Officer and Maharashtra State President Bhikaji Kamble, Major General P. S. Major Suresh Bhalerao, Major Vinod Kamble, Major Rajaratan Thorat, Major Malhari Londhe, Major Anil Kamble, Major Kiran Alhat etc. from Dhoble and Pune were present.

The event was organized by Manoj Garbade, Akash Ijagaj and their colleagues on behalf of Pimpri Chinchwad Unit.

On this occasion Dr. Bhimrao Ambedkar was felicitated as an Ambedkari Yoddha for his active participation / support in the Shahifek case held in honor of great men. Around 300 lawyers, various organizations, political parties and individuals who helped Manoj Gadbade and his colleagues, around ten thousand dignitaries were felicitated.

130 officers/soldiers paid tribute to Dr. Babasaheb Ambedkar on behalf of First Samata Sainik Dal. After that the child soldiers gave a general salute to Dr. Bhimrao Ambedkar.

Samata Library at Dr. Babasaheb Ambedkar Statue

Inauguration was done by Dr. Bhimrao Ambedkar. Dr. Bhimrao Ambedkar Saheb, all the soldiers and thousands of people present took oath on the Preamble of the Collective Indian Constitution. The program was attended by people from various districts of Maharashtra in large numbers.

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...