मान्यवरांची भाषणे ऐकण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
https://www.youtube.com/live/pCJmGa7qgxY?feature=share
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने दिनांक 22 मार्च 2023 रोजी शतकोत्तर मानगाव परिषद संपन्न झाली.
मान्यवरांच्या हस्ते प्रतिमांचे पूजन झाल्यानंतर पूज्य भंते धम्मप्रिय यांनी त्रिसरण पंचशील दिले. तद् नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.
यावेळी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब आणि विक्रम सिंह पाटील साहेब यांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1920 साली माणगाव येथे परिषद भरवली होती त्या गोष्टीला 2020 मध्ये शंभर वर्षे झाली होती. कोरोनाची महामारी असल्यामुळे 2020 मध्ये माणगाव परिषदेला शंभर वर्षे झाल्याबद्दल चा कार्यक्रम घेता आला नाही .तो कार्यक्रम आज 22 मार्च 2023 रोजी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने शतकोत्तर माणगाव परिषद म्हणून घेण्यात आला.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माणगाव परिषद संपन्न झाली.
यावेळी आदरणीय डॉक्टर भीमराव साहेब यांनी आपल्या भाषणातून सांगितले की महापुरुषांच्या विचारांचा वारसा घेऊन चाललो आहोत. शंभर वर्षांपूर्वी ज्या गोष्टीसाठी माणगाव येथे परिषद भरवण्यात आली होती ते कॉमन कॉज म्हणजे जाती निर्मूलन झाले पाहिजे. परंतु आजही जाती निर्मूलन होताना दिसून येत नाही तर जाती घट्ट होताना दिसतात.
फुले शाहू आंबेडकर समाज महापुरुषांच्या विचारावर चाललेला समाज आहे. इतर समाजाला प्रबोधन करण्यासाठी ही परिषद निमित्त आहे. असे डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी प्रतिपादन केले.
समतेचा विचार ,न्यायाचा विचार, माणुसकीचा धम्म, करुणा ही लोकांपर्यंत जाईल आणि भारतामध्ये असलेली असमानता, विषमता ही संस्कृती लोप होईल अशी इच्छा डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी व्यक्त केली.
महापुरूष कोणत्याही एका जातीचे किंवा विभागाचे नसतात ते देशाचे असतात . ते संपूर्ण मानवतेचे आहेत.छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचारांचा वारसा महात्मा फुलेंनी पुढे नेला ,छत्रपती शाहूंनी तो पुढे नेला आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तो बहुजनात नेला ,महापुरुषांनी जातीयता नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भीमराव य आंबेडकर यांनी माणगांव येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर च्या वतीने आयोजित ऐतिहासिक माणगाव परिषदेचा शताब्दी महोत्सव कार्यक्रमात केले.
याप्रसंगी संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस. के. भंडारे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बाबासाहेबांची धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी तुम्हा आम्हाला काम करावे लागेल. समविचारी संघटनांना एकत्र घेऊन धम्मक्रांती गतिमान करायची आहे. धम्म क्रांती गतिमान केली नाही तर पुन्हा आपल्याला सांकेतिक पद्धतीने मडकं आणि खराटा आल्याशिवाय राहणार नाही. असे आदरणीय एस. के. भंडारे साहेब यांनी आपल्या भाषणात सांगितले.
संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय जगदीश गवई साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या देशातील जातीयता नष्ट करण्यासाठी महामानवांनी प्रयत्न केले. शाहू महाराजांनी होळकरांच्या घरातील बाई सून म्हणून आणली आणि दोन समाजामध्ये एकी घडवण्याचे काम केले. या कृतीतून रोटी आणि बेटी व्यवहार झाला पाहिजे एवढा महान संदेश या महामानवांनी दिला .असे आदरणीय जगदीश गवई साहेब यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
आदरणीय सुषमाताई पवार संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा महिला विभाग प्रमुख यांनीही शुभेच्छा मार्गदर्शन केले.
या परिषदेला बार्टीने आर्थिक साह्य केले होते .बार्टीच्या वतीने आदरणीय डॉक्टर सत्येंद्रनाथ चव्हाण त्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अस्पृश्यांनी किती यातना भोगल्या असतील हे कोरोनाने जगाला दाखवून दिले. हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून कोरोनाकडे पाहिले पाहिजे. असे डॉक्टर चव्हाण यांनी आपल्या भाषणातून सांगितले.
कोल्हापूर येथील बिंदू चौक ते माणगाव जवळजवळ 25 ते 30 किलोमीटर अशा पद्धतीने रॅली काढण्यात आली.
कोल्हापूर जिल्हा शाखेचे अध्यक्ष एस. पी. दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव परिषद संपन्न झाली.
यावेळी दोन महत्वाचे ठराव करण्यात आले ते असे की,1
)डॉ बाबासाहेब आंबेडकर माणगाव येथे परिषदेसाठी आले होते त्यावेळी ते ज्या प्राथमिक शाळेत वास्तव्यास होते ती दुरावस्थेत असलेल्या शाळेचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करावे.
2)माणगाव येथील गांव तलावाचे सुशोभीकरण करून तेथे शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य पुतळे उभारावेत. या ठरावाचे वाचन व सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस अरविंद कांबळे यांनी केले.
या परिषदेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून आदरणीय बी.एच. गायकवाड साहेब राष्ट्रीय सचिव, आदरणीय एस. एस. वानखडे साहेब (प्रशिक्षण विभाग प्रमुख), आदरणीय राजेश पवार साहेब राष्ट्रीय सचिव, आदरणीय बी. एम. कांबळे साहेब राष्ट्रीय सचिव, आदरणीय अगाने काका राष्ट्रीय सदस्य महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय भिकाजी कांबळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस आदरणीय सुशील कुमार वाघमारे साहेब ,महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष आदरणीय विजय कांबळे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय रवींद्र इंगळे साहेब,, समता सैनिक दलाचे हेडक्वार्टर आदरणीय डी. एम. आचार्य साहेब , सुरेश कांबळे साहेब , महिला विभागाच्या सचिवा आदरणीय रागिनीताई पवार, स्वातीताई शिंदे. एस. आर. कांबळे. रुपेश तामगावकर ,सुनंदाताई वाघमारे अशोक कदम, दादासाहेब भोसले, व्हि .डि. हिवराळे, पी .एस .ढोबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Centenary Mangaon Parishad 2023
The Buddhist Society of India District Branch Kolhapur held a centenary Mangaon Parishad on 22nd March
Pujya Bhante Dhammapriya after worshiping the images by dignitaries
He gave Trisaran Panchsheel. After that the program started.
In 2020, 100 years have passed since Dr. Babasaheb Ambedkar held a conference at Mangaon in 1920. In 2020, Mangaon Parishad could not hold a program to mark its centenary due to the Corona epidemic. That event was held today on 22nd March 2023 as Centenary Mangaon Parishad on behalf of The Buddhist Society of India District Branch Kolhapur.
The Mangaon Parishad was concluded under the guidance of Dr. Bhimrao Yashwant Ambedkar, National Working President of The Buddhist Society of India. On this occasion, respected doctor Bhimrao Saheb said in his speech that we are carrying on the legacy of the thoughts of great men. The common cause for which the conference was held at Mangaon a hundred years ago should be caste eradication. But even today caste elimination is not seen but caste is getting stronger.
Phule Shahu Ambedkar Society is a society based on the thoughts of great men. This conference is an occasion to enlighten other communities. Dr. Bhimrao Yashwant Ambedkar asserted this. Dr. Bhimrao Yashwant Ambedkar expressed the desire that the thought of equality, the thought of justice, Dhamma of humanity, compassion will reach the people and the culture of inequality and disparity in India will disappear.
On this occasion, the National Vice President of the organization respected S. K. Bhandare Saheb expressed his thoughts. You and I have to work to make Babasaheb's Dhammakranti more dynamic. Like-minded organizations should be brought together to speed up the Dhammakranti. If we don't speed up the Dhamma revolution, we will have to suffer again symbolically. Respected S. K. Bhandare Saheb said in his speech.
Honorable Jagdish Gawai Saheb, National Vice President of the organization expressed his thoughts. Great man tried to destroy caste in this country. Shahu Maharaj brought a woman from Holkar's house as daughter-in-law and worked to unite the two communities. This great man gave a great message that roti and beti should be traded through this act. Respected Jagdish Gawai Saheb said this in his speech.
Honorable Sushmatai Pawar, National Vice President, Head of Women's Division of the organization also conveyed greetings.
The conference was financially supported by Barty. Respected Doctor Chavan also expressed his concern on behalf of Barty. Corona showed the world how much suffering the untouchables must have suffered. Corona should be seen as an excellent example of this. Dr. Chavan said this in his speech.
The rally was held from Bindu Chowk in Kolhapur to Mangaon in a manner of about 25 to 30 km. Kolhapur District Branch President S. P. Dixit Mangaon Parishad concluded under the chairmanship.
General Secretary of Kolhapur District Branch coordinated by Mangaon ParishadR Respected Mr. Satish Mangaonkar did.
Honorable B. H.Gaikawad as the chief presence for this conference. B.H. Gaikwad Saheb National Secretary, Honorable S. S. Wankhade Saheb (Head of Training Department), Hon'ble Rajesh Pawar Saheb National Secretary, Hon'ble B. M. Kamble Saheb National Secretary Hon'ble Agane Kaka National Member Maharashtra State President Hon'ble Bhikaji Kamble Saheb, Maharashtra State General Secretary Hon'ble Sushil Kumar Waghmare Saheb, Maharashtra State Treasurer Hon'ble Vijay Kamble Saheb, Maharashtra State Vice President Hon'ble Rabindra Ingle Saheb, Samata Sainik Dal Headquarters Hon'ble D. M. Acharya Saheb, Honorable Madhukar Hivarale Saheb, Suresh Kamble Saheb, Honorable Ragini Pawar, Secretary of Women Department, Swati Tai Shinde. etc. dignitaries were present.
No comments:
Post a Comment