Wednesday, March 29, 2023

आक्रोश धरणे आंदोलन

 प्रेस नोट

मंत्रालयावर व  प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महात्मा फुले यांच्या जयंती दिनी आरक्षण हक्क कृती समितीचे  आक्रोश धरणे आंदोलन


मुंबई - आरक्षण हक्क कृती समितीच्या राज्य निमंत्रक असलेल्या  महाराष्ट्रातील सर्व मागासवर्गीय संघटनांची दि . 28/3/2023 रोजी ऑनलाईन बैठक संपन्न झाली. तीत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी दि. 11/4/2023 रोजी महात्मा फुले यांना वंदन करून खाजगीकरणाचा व ज्यात आरक्षण नसलेला दि.14/3/2023 चा काढलेला शासन निर्णय  तात्काळ रद्द करावा ,मा.सर्वोच्य न्यायालयाने दि 28/1/2022 रोजी आदेश दिले असून  त्या अनुषंगाने केंद्र सरकारने (डीओपीटी) दि 12/4/2022 रोजी निर्देश देऊन सुद्धा सरकारने पदोन्नतीतील आरक्षण न देणे,जुनी पेन्शन योजना सर्व निम सरकारी महामंडळे /प्राधिकरण यांसह  सर्वाना सुरू करणे ,सरकारने नेमलेल्या समितीने तीन महिन्यातच अहवाल द्यावा इत्यादी विविध प्रश्नासाठी सर्व मागासवर्गीय - बहुजन संघटनांचा मंत्रालयावर( मुंबई ,नवीमुंबई ,ठाणे ,पालघर जिल्ह्यांचा ) आणि इतर सर्व जिल्ह्यांचा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर  जन आक्रोश धरणे आंदोलन करण्याचा  निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य निमंत्रक अनुक्रमे 

 मा.सुनिल निरभवने ( राज्य परिवहन ), मा.एस के भंडारे (म्हाडा गृहनिर्माण ),मा .सिद्धार्थ कांबळे (सेंट्रल रेल्वे युनियन ) , मा. शरद कांबळे (बँक असोशिएशन ),मा. विजय चौरपगार ( शासकीय अधिकारी कर्मचारी संघटना ), मा.शामराव जवंजाळ (मागासवर्गीय शिक्षक संघटना ),सुरेश पवार ( आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटना ) आणि  मा.गौतम कांबळे (शिक्षक संघटना ) इत्यादी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

  आपल्या SC,ST,DT,

NT,SBC,OBC च्या न्याय हक्कासाठीच्या लढ्यात  मोठ्या संख्येने  सहभागी व्हावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समितीने केले आहे.


एस के भंडारे

राज्य समन्वयक

आरक्षण हक्क कृती समिती

No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...