Monday, May 22, 2023

गुजरात मध्ये भव्य धर्मांतर संपन्न



गुजरातमध्ये भव्य धर्मांतर संपन्न .

 जे डॉ बाबासाहेबांच्या धम्म क्रांती बरोबर आले ते पुढे निघून गेले.

 डॉ भिमराव य आंबेडकर.

गुजरात (दि 20,21 मे 2023)- गुजरातची जनता  गुलामीच्या मानसिकतेत  होती ती आता बदलत असून  गुजरात ही बुद्धाची भूमी आहे.जे डॉ बाबासाहेबांच्या क्रांती बरोबर आले ते पुढे निघून गेले . जो पर्यंत हिंदू रहाल तो पर्यंत मारले जाल .त्यामुळे आपण बुद्ध धम्मात घर वापसी केली पाहिजे ,तसेच देशाची उच्च नीच तेची प्रतिमा बदलली पाहिजे असे सारांशाने प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया  व राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल ) यांनी गजरात राज्यातील राजकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण , जुनागड जिल्ह्यातील हडमतिया येथील भव्य बौद्ध धम्म दीक्षा समारोह ,आणि तालाला येथे  प्रबुद्ध डेव्हलपमेंट फौंडेशनच्या मातोश्री रमाई आंबेडकर भवनचे उद्घाटन  इत्यादी कार्यक्रमात केले .

  या कार्यक्रमात डॉ हरीश रावलिया ( ट्रस्टी चेअरमन ), कॅप्टन प्रवीण निखाडे (ट्रस्टी ) , एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफीसर ), बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ) यांनी मार्गदर्शन केले.

डॉक्टर भिमराव यशवंत आंबेडकर यांनी माता रमाई चे  अनेक प्रेरणादायी प्रसंग सांगितले.छत्रपती शाहू महाराज हे रमाईला बहीण मानत होते.  रमाई चा  त्याग नव्हे तर प्रेरणा व स्फूर्ती सांगणे आवश्यक आहे.

 धम्म दीक्षा सुमारे 5 हजार लोकांनी घेतली. त्याचे आयोजन भन्ते आनंद व मनसुख भाई वाघेला यांनी केले होते.   यावेळी  राजकोट , हडमतिया ,तालाला येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास डॉ भिमराव यशवंत आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.   ऑल इंडिया एस सी ,एस टी रेल्वे एम्प्लॉईज असोशिएशन पश्चिम रेल्वे राजकोट यांनी  व गोंडल  येथील समाजाने डॉ भिमराव आंबेडकर यांचे स्वागत केले .यावेळी गुजरात राज्याचे सामंतभाई सोळंकी , नरेशभाई सांकट, भानूभाई  चौहान , समता सैनिक दलाचे गुजरात प्रमुख पी. एल. मारू ,डी .के .मकवाना व त्यांची  समता सैनिक दलाची  टीम, कार्यकर्ता ,समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















 



No comments:

Post a Comment

विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...