Wednesday, June 14, 2023

भारतीय बौद्ध महासभेला 1 लाखाचे धम्मदान

 भारतीय बौद्ध महासभेला  1 लाखाचे धम्मदान

मुंबई - भारतीय बौद्ध महासभेचे अविरत चालू असलेले उत्कृष्ठ काम व केंद्रीय कार्यालयात  नियमित पणे मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांचे काम काज पाहून  आयु. मिलिंद शिर्के  प्रभावित झाले व त्यांनी  दि. 13/6/2023 रोजी डॉ आंबेडकर भवन,दादर येथील संस्थेचे  केंद्रीय कार्यालयात 1 लाख रुपये रोख  धम्म दान  संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई  केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. एस.के.भंडारे यांच्याकडे दिले. 

आद.एस .के. भंडारे यांनी त्यांना विचारले असता , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी  आपल्या पगारातला  20 वा हिस्सा पगारातून दर महिन्याला बचत करून समाज कार्यास दान देत असतो  असे त्यांनी सांगितले. दान दिल्याबद्दल त्यांचे भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यकर्त्यांकडून सर्वत्र  अभिनंदन होत आहे.





2 comments:

  1. आयु. मिलिंद शिर्के यांचे मनःपूर्वक धन्यवाद। दानाच्या माध्यमातूनच चळवळीचे कामकाज चालते, याची जाणीव आपणास आहे याबद्दल तुमचा अभिमान वाटतो।

    ReplyDelete
  2. भारतीय बौद्ध महासभा संपूर्ण भारतात कार्यरत आहे. आपण योग्य ठिकाणी दान देऊन आपली दान पारमिता पूर्ण केली. आपल्या पुण्य कर्मात अशीच वाढ होत राहो ही मंगल कामना.

    ReplyDelete

ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...