Sunday, December 24, 2023

संविधानाने भारतीयांना दिलेल्या मूलभूत अधिकार व हक्काच्या विरोधातील कोणतेही कायदे ,मनुस्मृती व चातुर्वण्यच्या विषमतावादी रूढी -परंपरा कलम 13 नुसार रद्द होतात. - एस के भंडारे

      ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️      

    भारतीय बौद्ध महासभा

संस्थापक अध्यक्ष :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन  : डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

 चैत्यभूमी वर समता सैनिक दलाचे महिला केंद्रीय शिक्षिका शिबिर 

  ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️    

मुंबई - अस्पृश्यतेतील स्त्री -पुरुष  व सर्व जातीतील स्त्रियांना शिक्षणाचा,समानतेचा अधिकार नव्हता , मनुस्मृती व चातुर्वण्य मध्ये स्त्री ही गुलाम व पुरुषांची संपत्ती होती ,पुरुष तीला विकु किंवा गहाण ठेऊ शकत होता तीला स्वतः ला कोणताही अधिकार नव्हता त्यामुळे महात्मा जोतिराव फुले -सावित्रीमाई फुले यांनी प्रथम शिक्षण दिले  व डॉ बाबासाहेबांनी त्यांना संविधानात स्वातंत्र्य व समानतेचा अधिकार प्राप्त होण्यासाठी विविध मूलभूत अधिकार व हक्क बहाल केले आहेत.धर्म ,वंश , जात ,जन्म ठिकाण,लिंग  इत्यादीनुसार भेदभाव कलम 14,15 नुसार करता येणार नाही ,सर्व समान आहेत अशी तरतूद केली आहे ,कलम 17 नुसार अस्पृश्यता  नष्ट केली असून अस्पृश्यता बाळगणे हा गुन्हा ठरविला आहे.येवढेच नाहीतर संविधानाने भारतीय नागरिकांना   कलम 14 ते 30 नुसार दिलेले समानता ,स्वातंत्र्य , शोषणाविरुद्ध ,धार्मिक स्वातंत्र्य आणि  सांकृतिक व शिक्षण या  मूलभूत अधिकार व हक्कच्या विरोधातील कोणतेही कायदे कलम 13 नुसार  शुन्यवत ठरविलेले आहेत .त्यामुळे मनुस्मृती व चातुर्वण्यच्या विषमतावादी रूढी -परंपरा रद्द झालेली आहे , ती कोणावरही लादू शकत नाहीत असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे यांनी समता सैनिक दलाच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती दहन करून भारतीय महिला मुक्ती दिली त्या दिवसाचे अवचित्यसाधून दि 24/12/2023 ते 25/12/2023 रोजीच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ,चैत्यभूमी ,दादर पश्चिम मुंबई येथील   सैनिक  केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण  शिबिराच्या उदघाटन प्रसंगी केले .ते पुढे असे म्हणाले की , भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलात प्रथम महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी पदे देऊन सन्मान दिला आणि आतातर डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली  आम्ही राज्य ,

जिल्हा ,तालुका स्तरावर  महिलांच्या स्वतंत्र कार्यकारिणी करून  महिलांना स्वाभिमानाचे स्वातंत्र स्थान दिले आहे. आता पुढे स्वातंत्रपणे महिलांनाच महिला शिकवतील अशा केंद्रीय शिक्षिका निर्माण कराव्यात. प्रथम एस के भंडारे यांच्या हस्ते  ध्वजारोहण होऊन उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला . या प्रसंगी  शिवाजी पार्क पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक संध्याराणी भोसले उपस्थित होत्या त्यांना एस के भंडारे यांच्या हस्ते भारतीय संविधान देऊन सन्मान केला. त्यांनी मी आज जे काही आहे ते केवळ डॉ बाबासाहेब व त्यांच्या संविधानामूळे असल्याचे सांगितले .या प्रसंगी भन्ते  श्रद्धापाल उपस्थित होते. या केंद्रीय शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर अशोक कदम ,हेडक्वार्टर सचिव डी एम आचार्य , असि लेफ्टनंट जनरल चंदाताई कासले व प्रदिप कांबळे , उपसचिव मोहन सावंत ,लेफ्टनंट कर्नल वंदनाताई सावंत व विनीताताई माने  उपस्थित होत्या. तसेच लेफ्टनंट कर्नल रविंद्र इंगळे , मुंबई प्रदेशचे सिद्धार्थ अहिरे व महादेव गायकवाड इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.या दोन दिवशीय शिबिरात मुंबई , ठाणे , रायगड , पालघर ,बिदर(कर्नाटक) ,बीड़ ,पुणे ,जालना ,चंद्रपूर इत्यादी विविध जिल्ह्यातून एकूण 50 महिलां सैनिक /अधिकारी  सहभागी झालेले आहेत .





Wednesday, December 20, 2023

देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील* -डॉ भीमराव य. आंबेडकर

 ,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन :  डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️


देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील.

   -डॉ  भीमराव य. आंबेडकर 

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

बसवकल्याण ,कर्नाटक (दि. 16/12/2023) भारत भूमी ही बुद्ध भूमी असून ज्यांनी बुद्ध धम्म स्वीकारला ते जगात पुढे गेले ,त्यावेळी भारत जगात पुढे होता. बुद्धाने समता ,बंधुता दिली पण आता देशात उच्च - नीच बघितले जात आहे. त्यामुळे  एस सी ,एस टी, ओ बी सी,यांना बुद्ध धम्मात जोर जबरदस्ती न करता  आणावे लागेल ,अंध विश्वास ,पाखंड वाद धम्मात नाही ,बुद्धांनी देव ,आत्मा नाकारला. संविधान कलम 50/51 नुसार देशातील सर्व नागरिकांनी विज्ञानावर चालावे लागणार आणि कलम 15 नुसार धर्म ,वंश ,जात , रूढी परंपरा,लिंग यावर आधारलेली  विषमता संपवून  समता प्रस्थापित केलेली आहे त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्ण जगात सन्मान करतात.डॉ बाबासाहेब यांनी मानवता साठी काम केले आहे ,देशाचे नागरिकांचे हक्क आणि अधिकार यासाठी काम केले आहे केवळ  दलितांसाठी  नाही ,डॉ बाबासाहेब हे मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया आहेत त्यामुळे आता देशात कूटनीती चालली असल्याने आपणास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तिन्ही संस्था पुढे घेऊन जाव्या लागतील असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष ,समता सैनिक दलाचे समूह राष्ट्रीय अध्यक्ष  डॉ  भीमराव य आंबेडकर यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा बसवकल्याण तालुक्याच्यावतीने बसवकल्याण  येथे संध्याकाळी आयोजित केलेल्या वर्षावास समारोप कार्यक्रमात केले. यावेळी ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर एस के भंडारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रथम डॉ भीमराव य आंबेडकर यांना रथात बसवून  शहरातील   मुख्य रस्त्यावरून  बाबासाहेब आंबेडकर चौक  पर्यंत रॅली काढण्यात आली , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून  रॅलीचा समारोप करण्यात आला,रॅलीमध्ये समता सैनिक दलाच्या  सैनिकांची संख्या मोठी होती त्यामुळे रॅलीला विशेष महत्व प्राप्त झाले होते तसेच सभेच्या कार्यक्रमानंतर राहुल अन्विकर (औरंगाबाद ) यांचा बुद्ध - फुले - शाहू -आंबेडकर विचारधारावर आधारलेला गायनाचा अत्यंत उत्कृष्ठ कार्यक्रम संपन्न झाला.  या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने  कर्नाटक उत्तर राज्य शाखेचे अध्यक्ष मनोहर मोरे , देवेंद्र भालके , वैशालीताई  मोरे प्रा बापू गायकवाड (लातूर ), डॉ बाबू अन्दुरे ,मनोहर मैंसे , नागनाथ वाडेकर ,

बिदर जिल्हा ,गुलबर्गा व भालकी शाखेचे पदाधिकारी ,कार्यकर्ते  सामाजिक व स्थानिक ग्रामपंचायतमध्ये  निवडून  असलेले प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी गुलबर्गा येथील मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्माण केलेले प्रसिध्दी सिद्धार्थ बुद्ध विहारास डॉ भीमराव य आंबेडकर यांनी भेट दिली असता विहाराचे भन्ते व माजी कुलगुरू व्ही टी कांबळे यांनी स्वागत व सत्कार केला. तसेच रस्त्यात कपनुर येथे प्रकाश कपनुर यांच्या गावात डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्याला  भीमराव य आंबेडकर यांचे हस्ते हार अर्पण करण्यात आला व डॉ  भीमराव य आंबेडकर यांचे बुद्ध मूर्ती देऊन स्वागतही करण्यात आले.

      त्यानंतर दि17/12/2023 रोजी सकाळी कर्नाटक राज्यातील पहिले मोरखंडी येथे  बांधण्यात आलेले जेतवन बुद्ध विहारास डॉ भीमराव य आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांसह भेट दिली त्यावेळी बुद्ध विहार समितीने संस्थेला पाच हजाराचे धम्मदान दिले.




Monday, December 18, 2023

श्रीलंका पर्यटन : पोलारुनुआ

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

मध्यप्रदेश शाखेने काढलेल्या श्रीलंका पर्यटनाचे दिनांक 18/12/2023 रोजी चे फोटो

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️








उपरोक्त फोटो हे पोलारूनुआ या ठिकाणचे आहेत. येथे खडकामध्ये कोरून तथागतांच्या विविध मुद्रा असलेल्या मुर्ती कोरलेल्या आढळतात. 

या ठिकाणी 13व्या शतकात राजा पराक्रम बाहु यांचे राज्य होते तर गोर गरिबांचे शोषण केले गेले. 

या ठिकाणी राजाचा महल जाळून टाकण्यात आला होता तर राजाने बनविलेल्या महालात शत्रू पक्षाने केलेल्या हल्ल्यात राजाने स्वतः आत्महत्या केली. 

या परिसरात राज्य कारभार करण्या साठी सभागृह बांधण्यात आले होते, जे आता भग्नावस्थेत आहे.  येथे राजा व त्याचे मंत्री सभागृहात बसुन लोकतांत्रिक पद्धतीने म्हणजे लोकशाहीच्या पद्धतीने चर्चा केली जात असे. 

त्या परिसरात अनेक विहार निर्माण करण्यात आली आहेत. 

जगदीश गवई 

राष्ट्रीय उपाध्यक्ष 

केंद्रीय कार्यालय

मुंबई

Sunday, December 17, 2023

बोधिसत्वाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी हरेगाव येथे स्वाभिमान धम्मपरिषद

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️ 

दिनांक: १६ डिसेंबर १९३९ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थळ: हरेगाव, शुगर फॅक्टरी ता. कोपरगाव,जि. अहमदनगर येथे झालेल्या परिषदेत  "न्याय्य हक्काआड सरकार आले तर बंड करा पण अन्याय सहन करू नका".असा त्यांनी स्वाभिमानी संदेश दिला.त्याचा सतत १९ वर्षापासून बोधिसत्व पदस्पर्शाच्या त्या पवित्र भुमीत सालाबादप्रमाणे याही वर्षी स्वाभिमानी धम्म परिषदेचा कार्यक्रम व दहा दिवस अगोदर पासून सुरु असलेल्या बौध्दाचार्य -श्रामणेर प्रशिक्षण शिबिर व दोन उपासिका प्रशिक्षण शिबिरांचा सांगता समारंभ दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा: अहमदनगर (उत्तर) जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष आद. सुगंधराव ईंगळै यांच्या अध्यक्षतेखाली भव्य स्वरूपात यशस्वी पार पडला. 

सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून आद. वसंत पराड राष्ट्रीय सचिव,आद.राजेश पवार राष्ट्रीय सचिव,आद. अशोक केदारे राष्ट्रीय कार्यालयीन सचिव व आद. डी. टी. सोनावणे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य या अहमदनगर जिल्हा भुमीपुत्रांनी मार्गदर्शन केले.

त्या नंतर १० दिवस केंद्रीय शिक्षक म्हणून उपस्थित असलेले आद. सत्येंद्र तेलतुंबडे माजीअहमदनगर जिल्हा अध्यक्ष व सभाध्यक्ष आद. सुगंधराव ईंगळै याची भाषणे होउन कार्यक्रमाचा सरणंतयाने समारोप झाला.























श्रीलंका पर्यटन:मिहींतले व सिगिरिया फोर्ट

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन : डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

मिहीनतले, (त्या काळातील सिलोन) श्रीलंका या ठिकाणी सम्राट अशोकाचे सुपुत्र महास्थविर महा महेंद्र भारतामधुन येथे आले व राजा तिष्य व त्यांच्या अनेक नागरिकांना बौद्ध धम्माची दिक्षा देवून बौद्ध बनविले. महा महेंद्र यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थि धातु ठेवून त्यावर अति विशाल अशा पर्वतावर विशालकाय स्तुप निर्माण करण्यात आला. त्याचे दर्शन करण्यासाठी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा  शाखेच्या माध्यमातून श्रीलंका बौद्ध स्थल दर्शनाचे पर्यटन दिनांक 15 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 पर्यंत आयोजित करण्यात आले. या पर्यटना अंतर्गत बालाघाट, बैतुल, भोपाल, नागपुर, गोंदिया, यवतमाळ तसेच उत्तर प्रदेश राज्यातील असे एकुण 50 पर्यटक सामील झाले. मध्य प्रदेश दक्षिण राज्य शाखा अध्यक्ष आदरणीय चरण दास ढेंगरे यांच्या नेतृत्वाखाली लुंबिनी ट्रवेल्सचे आदरणीय भीमराव खोब्रागडे यांचे उत्कृष्ट आयोजन तसेच संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई व राष्ट्रीय सचिव व मध्य प्रदेश प्रभारी बी एच गायकवाड मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. 

आज दिनांक 17 डिसेंबर रोजी मिहींतले व सिगिरिया फोर्टचे यशस्वीपणे दर्शन करण्यात आले. 

जगदीश गवई 

राष्ट्रीय उपाध्यक्ष 

केंद्रीय कार्यालय 

मुंबई










Wednesday, December 13, 2023

महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज पुस्तकाचे प्रकाशन*

 ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष :  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंती दिनी महाउपासिका मीराताई आंबेडकर अर्थात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा दस्तावेज पुस्तकाचे प्रकाशन

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

मुंबई (12/12/2023)-  डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या  बौद्धांच्या शिखर धार्मिक संस्थेच्या  भय्यासाहेब आंबेडकर यांच्या निर्वाणानंतर   1977 पासून  गेली 45 वर्षं  अध्यक्षपद  भूषवलेल्या  आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी केलेल्या धम्म कार्यावर महा उपासिका मीराताई अर्थात  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा दस्तावेज या एस के भंडारे ,बी एच गायकवाड व अँड एस एस वानखडे या ताईसाहेबांच्या सहकाऱ्यांनी  लिहिलेल्या  पुस्तकाचे प्रकाशन डॉ आंबेडकर भवन ,दादर येथील दि 12/12/2023 रोजी  भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 111 व्या जयंतीच्या कार्यक्रमात आदरणीय महाउपासिका मीरा ताई आंबेडकर यांच्या उपस्थितीत  ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष  डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी डॉ भीमराव आंबेडकर असे म्हणाले की,मी जे देशभर कार्यक्रम करीत आहे,कार्याचे मजले बांधत आहे ते केवळ  आदरणीय ताई साहेब यांनी धम्माचा पाया घातल्या मुळेच करीत आहे. त्यांनी भय्यासाहेब यांच्या नंतर डॉ बाबासाहेब यांचा धम्म व संस्था संपूर्ण देशभर नेली.

     या पुस्तकात मीराताई यांचे महान धम्म कार्य,  एक अष्टपैलू नेत्रुत्व ,बहुमोल संदेश,क्रांतिकारक निर्णय ,आम्ही पाहिलेल्या मीराताई व त्यांच्या अध्यक्ष खालील अधिवेशने ,समता सैनिक दलाची पुन्हा उभारणी , कार्यकर्त्यांस प्रेरणादायी पैलू , संकल्प आणि दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा इतिहास अशी 10 प्रकरणे असून संकीर्ण याप्रकरणामध्ये मीराताई यांचे सन्मानपपत्रे , 100 निवडक सहकारी ,परिवार आणि जीवन -कार्यपट  याचा समावेश करण्यात आला आहे.अशी माहिती या  पुस्तकाचे एक संपादक  एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख ) यांनी सांगितली. या प्रसंगी दर्शनाताई  भीमराव आंबेडकर व मनीषाताई आनंदराज आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे ट्रस्टी व आंतरराष्ट्रीय सचिव कॅप्टन प्रविण निखाडे ,राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय महिला विभागाच्या प्रमुख सुषमाताई पवार,महाराष्ट्र राज्य शाखेचे राज्य अध्यक्ष भिकाजी कांबळे यांचे भाषण झाले. मुख्य वक्ता पाली भाषेचे अभ्यासक पी एस मंडपे यांचे भाषण झाले.अध्यक्ष स्थानी मुंबई प्रदेश शाखेचे अध्यक्ष उत्तम मगरे होते व सूत्रसंचालन मुंबई प्रदेश शाखेचे सरचिटणीस रविंद्र गवई होते. पुस्तक प्रकाशनास आदरणीय 

मीराताई  आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. या कार्यक्रमास केंद्र,महाराष्ट्र ,मुंबई पदाधिकारी व मुंबईतील संस्थेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












Sunday, December 10, 2023

श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर व धम्म परिषद

 ☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया

संस्थापक अध्यक्ष  : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रीय संरक्षक  : आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर

ट्रस्टी चेअरमन :  डॉक्टर हरीश रावलिया

राष्ट्रीय कार्याध्यक्ष  : डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर

☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️☸️


बुलढाणा उत्तर जिल्हा शाखेच्या जळगांव जामोद शाखेच्या वतीने भव्य अशा श्रामणेर बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबीर व धम्म परिषदेचे आयोजन यशस्वी पणे जळगांव जामोद या ठिकाणी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला. 

या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु , श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर यांचे बंधु तसेच समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डाॅ भीमराव आंबेडकर  साहेब उपस्थित होते.  या प्रसंगी त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. 

या वेळी महाराष्ट्र राज्याचे महामंत्री आयुष्य. सुशील वाघमारे देखील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष आदरणीय एस. एस. वले सर यांनी पार पाडले. 

या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे सोबत जोडले आहेत.






विश्वगुरु म्हणजेच तथागत भगवान बुद्ध” — डॉ. राजेश पवार गुरूजींचे प्रतिपादन

आनंदनगर, कल्याण (प्रतिनिधी): दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा “आनंद बुद्ध विहार”, आनंदनगर, कल्याण यांच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे ...