Posts

Showing posts from May, 2023

भिक्खू संघ का विशेष शिबिर

Image
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया के द्वारा भिक्खू संघ का विशेष शिबिर का आयोजन किया गया है| दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया के राष्ट्रीय उपाध्यक्ष एडवोकेट एस. के .भंडारे साहब ने शिबिर के बारे मे परिपत्रक जारी किया है| =================================== भिक्खु संघ विशेष शिवीर  सस्नेह जयभीम, दि बुद्धिस्ट  सोसायटी ऑफ इंडिया के भारतीय बौद्ध महासभा भिक्खु संघ के सभी भन्तेगण एवं संस्थाके साथ कार्यरत भन्तेगण और संस्था के साथ कार्य करने की मनिषा रखनेवाले सभी भंतेगण इनका विशेष शिवीर आदरणीय डॉ. भिमराव यशवंत आंबेडकर  (राष्ट्रीय कार्याध्यक्ष), पुज्य भन्ते बि. संघपालजी महाथेरो (राष्ट्रीय उपाध्यक्ष एवं बौद्धमहासभा भिक्खु संघ प्रमुख) आदि प्रमुख मान्यवरोंके मार्गदर्शन में शनिवार दि. 24.06.2023 को सुबह 9:00 से सायं 6.00 बजे तक) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभुमी, दादर (पश्चिम), मुम्बई - 400028 में आयोजित किया गया है।      अतः सभी पुजणीय भन्तेजी से नम्र अनुरोध करते हैं कि, अपना नामांकन भिक्खु संघ के सचिव पुज्य भन्ते सुमेध जी (मो. 8779734604) के पास दर्ज करें और इस विशेष शि...

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे विशेष चिंतन शिबिर

Image
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष चिंतन शिबिर आयोजन करण्यासंदर्भात संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एडवोकेट एस. के. भंडारे यांनी खालील परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. =================================== विशेष चिंतन शिबीर (दि. २५/६/२०२३- - मुंबई) दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे केंद्रीय, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रदेश मधील नियमीतपणे विषय देणारे / प्रबोधन करणारे वरिष्ठ पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक / शिक्षीका व सर्व जिल्हा अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांचे कार्यकर्ता विशेष चिंतन शिबीर आद. डॉ. भिमराव य. आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली रविवार दि. २५/६/२०२३ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत) डॉ. आंबेडकर भवन, दादर (पूर्व), मुंबई-14 आयोजित करण्यात आलेले आहे. चिंतन शिबीरामध्ये सहभागी होणा-या केंद्रीय शिक्षक/शिक्षीका यांची नावे केंद्रीय कार्यालकाडून निश्चीत केले जातील. तरी संबंधितांनी आपली नावे  ॲड. एस. एस. वानखडे (राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख म...

केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराला भोजन दान

Image
 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून चैत्यभूमी दादर, मुंबई येथे महिला केंद्रिय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  या केंद्रीय शिक्षिका प्रमाणपत्रक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यात घेण्यात आलेल्या निवड परीक्षेसाठी एकूण ३०९ महिला उपासिका बसल्या होत्या. या परीक्षेत बसलेल्या महिला उपासिकांची गुणवत्ता यादी तयार करण्यात आली. या यादीत सर्वात जास्त गुण मिळविलेल्या ५९ महिला उपासिका यांची केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरासाठी प्रविष्ट करण्यात आले.  चैत्यभूमी दादर, मुंबई येथे सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराला पालघर जिल्ह्यातील पालघर जिल्हा शाखा, बोईसर विभाग शाखा व डहाणू शहर शाखा यांच्या वतीने भोजनदानासाठी  १२०००/- ( बारा हजार रुपये)  धम्मदान देण्यात आले. हे धम्मदान केंद्रीय प्रशिक्षण विभागाकडे आज सुपूर्त करण्यात आले. त्याचे क्षणचित्रे.

सप्त बोध्यांगे

Image
दिनांक 22 मे 2023 रोजी चैत्यभूमी दादर येथील सुरू असलेल्या केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिरात आयुष्मान राजेश पवार राष्ट्रीय सचिव यांनी सप्त बोध्यांग हा विषय शिकविला. तो पुढील प्रमाणे. =================================== सप्त बोध्यांग  समजून घेण्यापूर्वी आपण बोधिपक्षीय धम्म काय आहे ते अगोदर समजून घेऊ. बोधिपक्षीयधम्म.  त्यावेळी भगवंतांच्या महापरिनिर्वाणाच्या तीन महिने पूर्वी भगवान कुटागार शाळेमध्ये निवास करीत होते. त्यांनी वैशालीच्या जवळपास जेवढे भिक्खु विहार करीत होते, त्या सर्वांना एकत्रित करविले. त्यांना आपली शेवटची अनुशासनपर देशना दिली. भगवंतांनी भिक्खुंना संबोधित करून म्हटले " भिक्खूनो, मी बोधिपक्षीय धम्माचा जो उपदेश दिलेला आहे तो चांगल्याप्रकारे शिकून ग्रहण करा, तशी भावना करा, चिंतन-मनन करून विकसित करा, जेणेकरून हे श्रेष्ठ जीवन मंगलमय होईल आणि ह्याने अनेकांचे कल्याण होऊन अनेकांना सुखाचा लाभ होईल." त्याचे सविस्तर विवरण करताना भगवंतांनी म्हटले "भिक्खुंनो, मी चार स्मृती  प्रस्थानांचा  उपदेश दिला आहे, चार सम्यक प्रयासांचा उपदेश दिला आहे. चार - ऋद्धिपादांचा उपदेश दिल...

गुजरात मध्ये भव्य धर्मांतर संपन्न

Image
गुजरातमध्ये भव्य धर्मांतर संपन्न .  जे डॉ बाबासाहेबांच्या धम्म क्रांती बरोबर आले ते पुढे निघून गेले.  डॉ भिमराव य आंबेडकर. गुजरात (दि 20,21 मे 2023)- गुजरातची जनता  गुलामीच्या मानसिकतेत  होती ती आता बदलत असून  गुजरात ही बुद्धाची भूमी आहे.जे डॉ बाबासाहेबांच्या क्रांती बरोबर आले ते पुढे निघून गेले . जो पर्यंत हिंदू रहाल तो पर्यंत मारले जाल .त्यामुळे आपण बुद्ध धम्मात घर वापसी केली पाहिजे ,तसेच देशाची उच्च नीच तेची प्रतिमा बदलली पाहिजे असे सारांशाने प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर ( राष्ट्रीय कार्याध्यक्ष,दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया  व राष्ट्रीय अध्यक्ष,समता सैनिक दल ) यांनी गजरात राज्यातील राजकोट येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण , जुनागड जिल्ह्यातील हडमतिया येथील भव्य बौद्ध धम्म दीक्षा समारोह ,आणि तालाला येथे  प्रबुद्ध डेव्हलपमेंट फौंडेशनच्या मातोश्री रमाई आंबेडकर भवनचे उद्घाटन  इत्यादी कार्यक्रमात केले .   या कार्यक्रमात डॉ हरीश रावलिया ( ट्रस्टी चेअरमन ), कॅप्टन प्रवीण निखाडे (ट्रस्टी ) ,...

75 वर्ष होऊन देश एक संघ नाही, धर्माच्या नावावर विभाजन करीत आहेत

Image
 75 वर्ष होऊन देश एक संघ नाही, धर्माच्या नावावर विभाजन करीत आहेत. सर्वाना एकत्रित बांधण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले .   डॉ भिमराव यशवंत आंबेडकर सांगली  : (11/12 मे 2023)ब्रिटिश राजवटीत मेथ्थले यांनी शिक्षणाचा व्यवस्थित प्लॅन करून शिक्षण दिले. त्यांच्यामुळे  महात्मा फुले शिकले व फुलेंनी सावित्रीला शिकविले.महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली त्यावेळी पहिली  विद्यार्थीनी खान ही मुस्लिम होती व शाळेसाठी जागा मुस्लिम ने दिली होती.त्यामुळे आपण शिकलो . नाहीतर...त्यावेळच्या व्यवस्थेमुळे आपण शिकुच शकलो नसतो व आताची जी प्रगती झाली आहे ती होऊच शकली नसती. 75 वर्ष होऊन देश एक संघ नाही, धर्माच्या नावावर विभाजन करीत आहेत. सर्वाना एकत्रित बांधण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि  त्यांच्या  संविधानाने केलेले आहे.  आपण संघटनांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांनी देश घडविला आहे.डॉ बाबासाहेब हे आधुनिक भारताचा निर्माता आहेत  हे  सर्वांना सांगावे. तसेच बौद्ध धम्म हा मातृ सत्ताक आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे बौद्ध धम्म प्रचार- प्र...

महाउपासिका मिराताई आंबेडकर यांना पद्म भूषण पुरस्काराची मागणी

Image
चैत्यभूमीमध्ये बुद्ध जयंती व आदरणीय  महाउपासिका मिराताई आंबेडकर यांचा वाढदिवस साजरा. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे समता सैनिक दल  पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय शिक्षक शिबिराचा समारोप महाउपासिका मिराताई आंबेडकर यांना पद्म भूषण पुरस्काराची मागणी मुंबई -(5/5/2023)  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल यांच्या वतीने  बुद्ध जयंती व आदरणीय महाउपासिका मिराताई आंबेडकर यांचा वाढदिवस  चैत्यभूमी ,दादर येथे सायंकाळी दर्शनाताई  भीमराव आंबेडकर ,मनीषाताई  आनंदराज आंबेडकर , सुजात प्रकाश आंबेडकर  इत्यादी सर्व आंबेडकर परिवारा च्या उपस्थित  मोठ्या उत्सहात साजरा केला . हा कार्यक्रम आद.डॉ भीमराव य. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.  या प्रसंगी भन्ते सुमेध बोधी, डॉ. हरिष रावलिया (ट्रस्टी चेअरमन )कॅप्टन प्रविण निखाडे (ट्रस्टी /आंतरराष्ट्रीय विभाग  सचिव ) ,एस के भंडारे(राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल ) ,सुषमाताई  पवार( राष्ट्रीय उपाध्यक्ष  व केंद्रीय महिला विभाग प्रमुख ), बी एम कांबळे (राष्ट्र...