Saturday, July 6, 2024

रायगड दक्षिण जिल्हा शाखेचे कार्यकर्ता /चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न

 



आज दिनांक 6 जुलै 2024 रोजी  दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा रायगड दक्षिण जिल्हा  शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव  यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महाड येथे कार्यकर्ता /चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले .

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव राजेश पवार व  महाराष्ट्र राज्य शाखेचे उपाध्यक्ष व माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष डी टी सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्ता/चिंतन प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले.

राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेश पवार यांनी आजच्या कार्यकर्ता/ चिंतन प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन केले.  कार्यकर्ता/चिंतन प्रशिक्षण शिबिरात ओळख परिचय झाल्यानंतर राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी प्रशिक्षणार्थींची ऑनलाइन पूर्वार्ध चाचणी परीक्षा घेतली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा शाखेचे सरचिटणीस आदरणीय नवनीत साळवी गुरुजी यांनी केले.

आभार प्रदर्शन रायगड जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रदीप मोहिते गुरुजी यांनी केले .

आजच्या कार्यकर्ता /चिंतन शिबिरामध्ये पुढील प्रमाणे विषय घेण्यात आले.

१) प्रशिक्षण शिबिर उद्घाघाटन व परिचय .

2) दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ध्येय उद्दिष्टे व मिशन 

3)शाखेचे कामकाज कसे करावे आणि हिशोब कसा लिहावा .

4)कार्यकर्त्याची आचारसंहिता आणि प्रबोधनाची आचारसहिता .

5)पदाधिकाऱ्यांची जबाबदारी 

6)मनोगत 

7)उत्तरार्ध ऑनलाइन चाचणी परीक्षा 

8)अध्यक्षिय भाषण 

9)सरणतय 

माजी राष्ट्रीय कोषाध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय  डी टी सोनावणे गुरुजी  यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतिमान कशी होईल या विषयावर मार्गदर्शन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती गतीमान कशी करावी? अर्थात बीएसआय मिशन

 पूर्वपीठिका 

प्राचिन वैदिक कालापासून मनुस्मृति नुसार अस्पृश्य स्त्री/पुरुषांना चार वर्णाच्या (ब्राम्हण, श्रत्रिय, वैश्य, शुद्र) स्त्री यांना स्वतंत्र्य, समानता तसेच शिक्षणाच्या हक्कापासून वंचित ठेवले होते. त्यांना धर्म रुढी परंपरा या नावाखाली गुलामीत ठेवले होते. अस्पृश्यांना कुत्र्या-मांजरा पेक्षाही हिन वागणूक होती. त्यांचा स्पर्श व थुंकिचा विटाळ होत होता म्हणून गळ्यात मडके व पाऊल खुणा दिसू नयेत म्हणून कमरेला खराटा होता. 

डॉ. बाबासाहेब यांची धम्मक्रांती.

जगाचा इतिहास पाहता जगात अनेक क्रांत्या झाल्यात, फ्रांस मध्ये (फ्रेंच राज्य क्रांती) तीन १७८९, १८३० आणि १८४८ च्या क्रांतीने राजेशाही आणि प्राचिन राजवट खाली आणली. त्याचा परिणाम राजा लुई सोळावा आणि त्याची प्रसिध्द पत्नी मेरी ॲंटोइनेट यांचा शिरच्छेद झाला.

प्रबोधनाच्या नवीन कल्पनांनी प्रभावीत होऊन अमेरिकन क्रांती १७६५ ते १७८३ या कालावधीत घडली. युरोपात १८४८ मध्ये गरीब, बेरोजगार आणि उपासमार असलेल्या शेतकरी आणि कामगारांच्या विद्रोहा सह सुशिक्षित मध्यम वर्गाने सुरु केलेल्या विविध राष्ट्रीय चळवळींचा आहे. या सर्व क्रांत्या रक्तरंजीत ठरल्या आहेत.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहिले, संविधानाच्या माध्यमातून चातूवर्णाच्या विषमतेतून मुक्त करून समता प्रस्तापित केली.

उदा. १) समानता (संविधान कलम १४ ते १८) सर्वांना समान वागणूक, कायद्यापुढे समान, धर्म, वंश, जात किंवा लिंग, जन्मस्थान यावरुन कोणताही भेदभाव नाही व अस्पृश्यता नष्ट केली आहे.

२) स्वातंत्र्य (संविधान कलम १९ ते २१) व्यक्तिगत स्वातंत्र्य तसेच भाषण, लिखान, भारतात कोठेही फिरणे, राहणे, स्थायीक होणे व व्यवसाय, व्यापार किंवा धंदा करणे आणि

३) धार्मिक स्वातंत्र्य (संविधान कलम २५ ते २८) कोणताही धर्म स्वीकारणे व आचरण करणे. 

धार्मिक स्वातंत्र्याचा अंगीकार करुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपुर मुक्कामी विषमतावादी हिंदु धर्माचा त्याग करून समतावादी बौध्द धम्माचा स्विकार केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता जागतिक अशी धम्मक्रांती केली आहे.

संविधान व धम्मक्रांती मूळे स्वाभिमान, स्वातंत्र्य, समता, न्याय व शिक्षण, नोक-या, अधिकार पदे मिळाली. सामाजिक स्थर उंचावला, विकास, प्रगती झाली. 

धम्मक्रांती मागे घेण्यासाठी विरोधकांची कार्यवाही

संविधानाला हिनवने, संविधान चांगले नाही हा अपप्रचार करणे, संविधानाला गोधडीची उपमा दिली, त्यातील तीन रंग हे अशुभ असल्याचा अपप्रचार करणे.

इथल्या एस.सी / एस. टी. वर अत्याचार करणे, शिक्षणातील आरक्षण संपविणे, शिष्यवृत्ती बंद करणे, खाजगीकरण, उदारीकरण तसेच जागतिकीकरण करणे इत्यादि. देशाच्या नविन संसद भवनाच्या पाया भरणी साठी त्यावेळचे राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांना बोलावले नव्हते.. तसेच संसद भवनाच्या उद्घघाटन प्रसंगी राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मु यांना सुद्धा निमंत्रित केले नाही.

 हिंदुराष्ट्राची संकल्पना अर्थात धर्मावर आधारीत (मनुस्मृती प्रमाणे) नविन संविधान तयार करणे. संविधानातील कलम १५ रद्द करण्याचा त्यांचा मनसुबा आहे.

संविधानातील कलम २५ नुसार प्रत्येकाला धर्म स्वातंत्र्य (Right to Religion) तसेच कलम २१ नुसार व्यक्तिगत स्वातंत्र्य (Right to choice of an Individual) दिलेले असतांना देखील धर्मांतरातील २२ प्रतिज्ञा वर बंदी घालणे, लव जिहादच्या नावाखाली कर्नाटक, उत्तरप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ, ओरिसा, मध्यप्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड आणि हरियाणा या सर्व राज्यात धर्मांतर विरोधी कायदे करण्यात आले आहेत.

मा. गुजरात उच्च न्यायालयाने, गुजरात राज्याचा (The Gujrat Freedom of Religion Act, 2021 ) हा कायदा ऑगस्ट २०२१ मध्ये रद्द केला आहे.

धम्मक्रांती गतिमान करण्याचा संकल्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून व बौध्द धर्मांतर करुन चातुर्वर्णाच्या विषमतेतून, गुलामगिरीतून बाहेर काढले व देशात समता प्रस्थापित केली. त्यामुळे आपण स्वाभिमानी, समतावादी बनून शिक्षण घेऊन नोकऱ्या  मिळविल्या, अधिकार पदे मिळाली, आपली सामाजिक व शैक्षणिक प्रगती व विकास झाला. परंतू समतेचे विरोधक व विषमतेचे पुरस्कर्ते यांना संविधान बदलून धर्मावर आधारित संविधान व राष्ट्र बनवायचे आहे. शिक्षणातील व नोकरीतील आरक्षण संपविण्यात येत आहे. खाजगीकरण व कंत्राटीकरण चालू आहे. मागसवर्गीयांवर अन्याय अत्याचार इत्यादीमुळे देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती मागे घेऊन जाण्याचा प्रयत्न होत आहे .त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती अधिक गतिमान करण्यासाठी आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यावर आधारित भारताचा आदर्श नागरिक बनविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल)  यांनी २०२४-२५ पर्यंत करोडो लोकांचे धर्मांतर  अर्थात  घरवापसी करण्याचा संकल्प ६६व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी ५ ऑक्टोबर २०२२ रोजी नागपूर येथे केला आहे. 

आठ गोल्डन मार्गाचा अवलंब करावा

संकल्प पूर्ण करण्यासाठी ज्याप्रमाणे तथागत भगवान बुध्द यांनी माणसाच्या जीवनात प्रगती होण्यासाठी आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे ८ गोल्डन पाथ ऑफ लाइफ सांगितलेले आहेत त्याप्रमाणे खालील ८ गोल्डन मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे.

१. चलो बुध्द की ओर अभियान जातीअंताची चळवळ:

चोवीस पॉइंट प्रोग्राम (शिबीरे) गावागावापर्यंत करणे. बहुजन समाज संघटना, समविचारी संस्था / संघटना सोबत समन्वय साधून धर्मांतर - घरवापसी परिषदा घेणे (इतर धर्मावर टिका टिप्पणी न करता.) धम्म परिषदा, धम्म मेळावे, धम्म रथ गावागावात फिरवणे. राष्ट्रपुरुष राष्ट्रसंत जयंती / पुण्यतिथी कार्यक्रमात सहभागी होणे. 

२. आचारो परमो धम्मो  :

 बौध्द धम्माचे काटेकोरपणे आचरण करणे.

 ३. बुद्धिस्ट आयडेंटिटी (बौध्द की पहचान) निर्माण करणे:

 केवळ जयभीम वाले अशी ओळख न होता संस्कारामधून बौध्द म्हणून ओळख होणे गरजेची आहे. संस्कारामध्ये एकसूत्रीपणा आणने व बौध्द लिखो अभियान (शाळा प्रवेशा वेळी धर्म बौध्द लिहिणे व जातीचा दाखला बौध्द करुन घेणे), बौध्द सभासद बनो अभियान (भारतीय बौध्द महासभेचे सभासद करणे) राबविणे.

४. टिम वर्क करणे :

कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी लिच्छविचे सात नियम पाळून काम करणे. टिमवर्क म्हणजे सर्वांनी मिळून एकत्रित समन्वयाने काम करणे (Total Efforts by All Members), वाद, मतभेद, लावालावी, निंदा, अपमान, इत्यादी न करणे.

५. धर्मांतरीतांच्या बरोबर रोटी-बेटी व्यवहार करणे :

 धर्मांतर झालेल्या व्यक्ती / समाजाबरोबर रोटी-बेटी व्यवहार करणे तसेच त्यांना संघटनेमध्ये योग्य स्थान देणे.

६. बुध्दविहार जोडो अभियान :

बुध्दविहार संस्था / संघटना / यांचेशी समन्वय साधून विविध कार्यक्रम घडवून - आणणे, बुध्दविहार नोंदणी करणे.

७. मंडळ जोडो अभियान : 

समाजातील युवक, महिला, जयंती मंडळे संस्थेबरोबर समन्वय साधून गाव / वार्ड पातळीपर्यंत शाहूवाडी पॅटर्नप्रमाणे शाखानिर्माण करणे. (गाव तिथे शाखा, शाखा तीथे बौद्धाचार्य, एक घर एक सैनिक) 

८. समाजाशी नाळ जोडणे: 

 समाजातील डॉक्टर, वकिल, व्यवसायिक आणि प्राध्यापक, शिक्षक, सरकारी / निमसरकारी / खाजगी अधिकारी इत्यादी जोडो अभियान राबविणे त्यासाठी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  मोफत सहाय्यता व सल्ला केंद्र निर्माण करणे.

जर आपण डॉ. बाबासाहेबांची धम्मक्रांती गतिमान करण्यासाठी वरील आठ मार्गांचा अवलंब केला नाहीतर पुन्हा पेशवाई येवून गळ्यात मडके व कमरेला खराटा येऊ शकतो (सांकेतिक) त्यामुळे आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुया.

प्रबोधनाची आचारसंहिता हा विषयावर मार्गदर्शन करताना डी टी सोनवणे गुरुजी यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले 

1. प्रबोधन करतांना संस्थेच्या चालू घडामोडी व उपक्रमा बाबतची माहिती जनतेला द्यावी,

जसे सभासद नोंदणी अभियान इत्यादी.

2. प्रबोधनकार हा बौध्दाचार्य, प्रशिक्षित श्रामणेर, प्रशिक्षित अंधश्रध्दा निर्मुलन शिबीर, व्यक्तिमत्व विकास शिबीर, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका शिबीर यामध्ये बसलेला असावा.

3. प्रबोधन / प्रवचन करतांना, विषय मांडतांना महापुरुषांचे वचन सांगतांना भेसळ करु नये. 

4. प्रबोधन करतांना विषय समजून घेणे, विषयाला सोडून बोलू नये.

5. बोलतांना प्रस्तावना खूप लांबलचक नसावी. 

6. सकारात्मक पध्दतीने बोलावे.

7. आपल्या कामामध्ये आणि हिशेबामध्ये पारदर्शकता असावी. 

8. सभागृहामध्ये समोर बघून बोलावे.

9. सामाजिक व धार्मिक भान ठेवून बोलावे. (टीका/ टीप्पणी करु नये, देवाधर्मावर बोलू नये.)

10. कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद राहील असे प्रबोधन करावे.

11. प्रत्येक धम्मप्रचारकाचा विषय लिखित असावा.

12. दिलेल्या वेळेत विषय संपवावा.

13. कार्यकर्त्याने वाचेवर संयम ठेवावा, सम्यक वाचेचे पालन करावे.

14. मार्गदर्शन करतांना किंवा विधी करतांना आपले उच्चार स्पष्ट असावेत. 

15. मार्गदर्शन करतांना स्वत:चा इतिहास, प्रौढी, मोठेपणा सांगत बसू नये.

16. मार्गदर्शकाने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित बुध्द आणि त्यांचा धम्म, शुद्र पूर्वी कोण होते ? अस्पृश्य मुळचे कोण ? पाकिस्तानची फाळणी, जातीअंताचा लढा आणि मुक्ती कोण पथे ?, क्रांती आणि प्रतिक्रांती किमान ही पुस्तके वाचावीत.

 राष्ट्रीय सचिव राजेश पवार यांनी हिशोब कसा ठेवायचा या विषयावर पुढील प्रमाणे  मार्गदर्शन केले.

शाखा कार्यालयीन कामकाज व शाखेचा हिशोब

अ) पार्श्वभूमी-

बायलॉज दि. २९/८/२००० च्या वार्षिक सभेमध्ये स्विकृती

प्रकाशन दि. १७/९/२००० (भय्यासाहेब आंबेडकर स्मृती दिन) रोजी चैत्यभूमी येथे आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर यांच्या हस्ते (बायलॉज समिती दि. २/३/२००० रोजी नियुक्ती, अध्यक्ष एस. के. भंडारे, राष्ट्रीय महासचिव)

ब) बायलॉज

एकुण १० कलमे व ८ परिशिष्ठे त्यामधील कार्यालयीन कामकाजा बाबतची खालीलप्रमाणे माहिती

सारांशाने देत आहोत. कलम VIII कार्यालयीन कामकाज आणि नियम

अ) कामकाज / हिशोबाचे वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च 

बी) कामकाजाचे दिवस आठवड्यातील कमीत कमी ३ दिवस (गुरुवार, रविवार, पोर्णिमा सोडून) 

सी) १. वरीष्ठ शाखेकडून प्राप्त झालेले पत्र / आदेशानुसार कार्यवाही करीत असले बाबत वरीष्ठ शाखेला कळविणे.

२. सी. आर. संदर्भ (सेंट्रल रेफरन्स) म्हणजेच केंद्राने/राज्याने सुचित केलेल्या पत्र/प्रकरण/तक्रार इत्यादीबाबत १५ दिवसाच्या आत केंद्र/राज्य शाखेला उत्तर/माहिती पाठवावी 

३. लेटरहेड - संस्थेच्या विहित नमुन्या प्रमाणे (परिशिष्ट २ )

४. शिवीर/कार्यक्रम मागणी अध्यक्ष, सरचिटणीस आणि संबंधित विभागाचा उपाध्यक्ष यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या वरीष्ठ शाखेला मागणी करणे व त्याची प्रत केंद्रीय प्रशिक्षण विभाग, केंद्रीय कार्यालय प्रमुख यांना पाठवावी.

डी) शाखा पदाधिका-यांचे शिक्के (परिशिष्ट ४) नाव कंसात टाकणे, नाव, पद व संस्थेचे नाव एकाच साईजचे असणे आवश्यक आहे. 

इ) कार्याची माहिती -

१. सरक्युलेशन फाईल - शाखेतील विविध कार्याची हँडबिल, पोस्टर, कार्यक्रम पत्रिका इत्यादीची बॉक्स फाईल सर्वांनी पाहण्यासाठी कार्यालयात ठेवणे

२. एस. ओ. फाईल (स्टँडींग ऑर्डर फाईल)- कामकाज, स्टेशनरी, धम्मदान, साहित्य, नियुक्त्या इत्यादी बाबतचे संस्थेची परीपत्रके, आदेश इत्यादी एकत्र ठेवावे व हि फाईल कधीही नष्ट करु नये, ती नेहमी कार्यालयातील मुख्य टेबलावर असावी.

जी) प्रत्येक जमा रक्कमेची पावती देणे जमा रक्कमेच्या पावतीसाठी भरणा पावती प्रत्येक शाखेने छापने आवश्यक आहे. शिबीर /कार्यक्रमामध्ये जनतेकडून सार्वजनिक पध्दतीने दान प्राप्त झाल्यास रु ५०/-पेक्षा जास्त रक्कमेची पावती देणे आवश्यक आहे.

तसेच दान स्वरुपात मिळालेल्या वस्तूची सुध्दा पावती दिली पाहीजे व त्याचे स्वतंत्र रजिस्टर ठेवावे व त्यामध्ये अथवा पावतीवर त्या वस्तूचा वापर कुठे केला आहे त्याचे एक विवरण किमान दोन पदाधिकारी यांनी प्रमाणित केले पाहिजे. विशिष्ट कार्यासाठी जमा केलेली रक्कमेसाठी स्वतंत्र धम्मदान पावती द्यावी. उदा. बुध्दविहार, महाविहार, भवन, कार्यालय बांधणे इत्यादी

एच) भरणा पावती व धम्मदान पावती छापण्यासाठीची मंजुरी केंद्र देते व त्यांनी दिलेले ऑर्डर नंबर त्या पावतीवर छापने आवश्यक आहे. ज्यांनी विनापरवाना छपाई केली तर त्यांची मध्यवर्ती शाखा/ प्रभारीला जबाबदार धरले जाते.

आय) शाखा बँक खाते - राष्ट्रीयकृत /स्थानिक/शेडयुल्ड बँकेत/जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत काढावे.. अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यापैकी दोघांच्या स्वाक्षरीने पैसे काढले जाईल. शाखेला जमा झालेली सर्व रक्कम बँकेत जमा करावी व हातात केवळ रु ५००/- शिल्लक ठेवावी.

जे) कॅशबुक/पेटीकॅशबुक ठेवणे  .जमा-खर्चाची प्रत्येक दिवसाची नोंद कॅशबुक (रोज किर्द) ठेवली जाते . व प्रत्येक महिन्याला हातातील व बँकेतील शिल्लक नमूद केल्यानंतर अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांची स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. पेटीकॅशबुकमध्ये प्रत्येक शिबीर/कार्यक्रम नुसार जमा-खर्च लिहावा. त्याचा एकुण जमा व खर्च कॅशबुक मध्ये नमूद करावा. अनामत रक्कमे साठी जमा पावती देणे आवश्यक आहे.

के) व्हाउचर (खर्चाचे बिल) परिशिष्ट ५ च्या नमुन्यात प्रत्येक शाखेने छापून घेणे आवश्यक आहे. हे व्हाउचर प्रत्येक बिलावर लाऊन अध्यक्ष / सरचिटणीस / कोषाध्यक्ष व ज्यांनी बिल संबंधितास दिले आहे त्याची/किंवा ज्याने रक्कम स्विकारली आहे त्यांची सही घ्यावी.

प्रत्येक खर्चाचे बिल संस्थेच्या संबंधित शाखेच्या नावावरील आवश्यक (वैयक्तीक पदाधिका-याच्या नावे असू नये)

एल) जमाखर्च अहवाल नमुना (परिशिष्ट ६) च्या नमुन्या प्रमाणे  आवश्यक आहे. 

जमाखर्च अहवाल आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये गाव/नगर/वार्ड शाखेने ३१ मे रोजी, - शहर / तालुका शाखेने ७ जून रोजी, जिल्हा शाखेने २१ जून रोजी आणि राज्य / प्रदेश शाखेने ३० जून रोजी मंजुर केल्यानंतरच आपल्या वरीष्ठ शाखेस सादर करावा.

एम) शाखेने ठेवावयाचे दप्तर कॅशबुक (रोजकिर्द), पेटीकॅशबुक, लेजरबुक (खतावणी), मिनिटबुक (प्रोसीडिंग बुक, इतिवृत्त नोंदवही) - कार्यकारीणी बैठकीसाठी व वार्षिक सर्वसाधारण सभा (जनरल बॉडी) सभेसाठी दोन वेगवेगळे आवश्यक, संस्थेकडून आणलेल्या स्टेशनरीचे स्टॉक रजिस्टर, डेडस्टॉक (मालमत्ता) रजिस्टर इत्यादी.

मुख्य शाखा २५ फाईल/रजिस्टर, संस्कार विभाग ४ रजिस्टर, महिला विभाग ३ रजिस्टर, प्रचार पर्यटन विभाग ६ रजिस्टर / फाईल, संरक्षण विभाग (समता सैनिक दल) ४ रजिस्टर / फाईल.

कलम IX - इतर महत्वपूर्ण सुचना व नियम

अ) शाखा कार्यालय प्रत्येक शाखेचे स्वतंत्र कार्यालय घेणे आवश्यक आहे, कार्यकारीणीने कार्यालय • कोठे असेल असे ठरविले नाही तर, सरचिटणीस यांचे घर हेच कार्यालय मानले जाईल.

बी) संस्थेने निश्चित केल्याप्रमाणे धम्मदान देणे/घेणे आवश्यक आहे. (आदेश क्र. ४३/२०२३दि. १९/६/२०२३) 

जी) पदाधिकारी यांची माहिती प्रत्येक वर्षी १५ जूलै पर्यंत देणे आवश्यक आहे.

एच) आरोप / तक्रार कोणतीही तक्रार लेखी स्वरुपात दोन प्रतीमध्ये असावी, तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याची एक प्रत तक्रार ज्याच्या विरुध्द आहे त्याला द्यावी. आवश्यक वाटल्यास केंद्र/प्रतिनिधी व्दारे • समोरासमोर चर्चा करुन निर्णय घेऊ शकते.

टिप - सोबत जमा-खर्च अहवालाचा नमुना (परिशिष्ट ६) व खर्चाचे व्हाउचरचा नमुना (परिशिष्ट ५)

मनोगतामध्ये गौतम वाघमारे प्रचार पर्यटन प्रमुख. नवनीत साळवी सरचिटणीस. प्रदीप मोहिते कोषाध्यक्ष. संतोष जाधव सचिव संस्कार विभाग . संदीप साळवी सचिव संरक्षण. संतोष साळवी कार्यालयीन सचिव हिशेब तपासणी चंद्रकांत गायकवाड. दिलीप चाफे संघटक. इत्यादी प्रशिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले. 

शेवटी रायगड जिल्हा शाखेचे अध्यक्ष संतोष जाधव यांनी अध्यक्षीय भाषण केले तद् नंतर उत्तरार्ध परीक्षा घेण्यात आली सरणतय घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




























Saturday, June 8, 2024

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

 



सर्वांना जयभीम.

 WhatsApp वर व्हायरल झालेला लेख वाचला. लेख आवडला म्हणून माझ्या ब्लॉग वर हा लेख प्रसिद्ध करीत आहे.

---------------------------

कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ

--------------------------------

वंचित बहुजन आघाडी

ही भाजपची B टीम आहे.

 असा अपप्रचार सातत्याने 2014 च्या निवडणुकीपासून मीडियाने आणि काँग्रेसने चालविला आहे.

आणि कालच्या 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जवळपास 6 ते 8 महिने अगोदरच काँग्रेस राष्ट्रवादी यांनी वंचित चे मतदार फोडण्यासाठी निरंजन टकले यांना कामाला जुंपले होते.

सोबतच विजय मोरे,तिसरा मेंदू लक्ष्मण माने. माने यांनी तर आधीपासूनच वाड्या वस्ती मध्ये जावून वंचित विरोधी वातावरण तयार केले. पत्रकार निखील वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी या सर्वांनी  

वंचित बहुजन आघाडी

विरोधी जनमानस तयार करण्यासाठी भ्रमंती केली. आणि वंचित बहुजनांना संविधान ह्या भावनिक विषया च्या माध्यमातून अलगद फसविले आणि लबाळ काँग्रेस च्या जाळ्यात टाकले.

आणि एवढ्यावरच ते थांबले नाही, तर शेवटी त्यांनी जे स्वयं घोषित बौध्द आंबेडकरी विचारवंतांना, साहित्यिकांना हळूहळू गळाला लावले

आणि हे सर्व अखेर काँग्रेसच्या षडयंत्राला अलगदपणे बळी पडले.

त्यामध्ये शेवटचा हातोडा डॉ.कसबे, सुनिल खोब्रागडे,डॉ.मुणगेकर, तुषार गांधी यांनी मारला. ह्यांनी दलाली घेऊन वंचितांच्या राजकारणाला थोपविण्याचा डाव रचला*.आणि या सर्वानी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन २०१४ पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचिताची जी मोट राजकीय बांधली होती तिला सुरुंग लावला

दलित,आदिवासी,शोषित, पीडित वंचित ह्या सर्वहारा वर्गाच्या राजकारणाला संपवण्यासाठी बुद्ध आंबेडकरी विचारवंत, साहित्यिक म्हणवून घेणाऱ्या वर्गाने खूप मोठ्ठा हातभार लावला. हे आपण गेल्या ५/६ महिन्यापासून पाहत आहोत. वंचितला भाजपची B टीम ठरवत राजकारणातून हद्दपार करण्याची आणि वंचितांचे स्वाभिमानी आणि सन्मानाचे आंबेडकरी बाण्याचे राजकारण चिरडून टाकण्याचे मनसुबे काँग्रेसने या सर्वांच्या साथीने नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण केले.

काँग्रेस यात सर्वार्थाने यशस्वी झाली. हरकत नाही काँग्रेस ने आज वंचितांना पुन्हा फसविले. हे वंचिताच्या लक्षात येईलच आणि परत आम्ही वंचित बहुजनाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर लढत राहू.

कारण आम्हाला माहित आहे की तुम्ही जनतेला एकदा दोनदा फसवू शकता, पण वारंवार जनतेला फसवू शकत नाही.फसवू शकत नाही. दलित, आदिवासी,भटका विमुक्त समाज,शोषित पीडित ,सर्वहारा वंचित समुहाचे स्वाभिमानी आणि सन्मानाचे आंबेडकरी बाण्याचे राजकारण करणाऱ्या ऍड.बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या राजकारणाला भाजपाला मदत करनारे राजकारण करतात. अशाप्रकारचे अत्यंत तकलादू आणि विवेकशून्य विश्लेषण करणाऱ्या स्व बुद्धिवादी/स्व बुद्धिजीवी स्वयंघोषित विचारवंतांची काँग्रेसी मानसिकता या निमित्ताने उघडपणे चव्हाट्यावर आली आहे.हे आपल्या सर्वांच्या लक्षात आले. खरं तर आपल्या नेत्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेऊन आपले सर्व पत्ते माध्यमाच्या समोर खुले केल्यामुळे हे घडले. जर मा. ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी वारंवार पत्रकार परिषदा घेतल्या नसत्या, तर आपली रणनीती भाजप आणि काँग्रेस यांना समजली नसती.आणि त्यांना आपल्या विरुद्ध हे स्वयं घोषित आंबेडकर वादी सोडता आले नसते. *नेमके काँग्रेस ने शेवट च्या क्षणा पर्यंत आपल्याला त्यांचा डाव कळू दिला नाही. कारण त्यांना संविधान वाचवायचे नव्हते तर ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित नेतृत्वाला सत्ते बाहेर ठेवायचे होते. ही त्यांची हुशारी त्यांनी साधून घेतली. व ते यशस्वी झाले.पण आपल्याला मात्र त्यांनी बाहेर झूलवत ठेवलं. जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा आपणही आपले हुकमी पत्ते हे उघड करायला हवे होते पण bjp काँग्रेस चे दलाल मीडिया वाले ऍड. मा. बाळासाहेब आंबेडकर यांना उलट सुलट असे प्रश्न विचारून सर्व डाव वंचिताच्या राजकारणावर उलटवला. मला वाटते की युतीचे राजकारण करण्यासाठी आपण कुठेच काहीच न बोलता अगदी शेवटच्या क्षणा पर्यंत आपले पत्ते उघड करू नये. व पत्रकार परिषद घेऊन आपली रणनीती वेळेच्या अगोदर उघड करू नये.मीडियावाले हे पत्रकार नाही तर काँग्रेस बीजेपी चे दलाल आहे. ते सत्य कधीच जनते समोरमांडत नाही. उलट जनता बुचकळ्यात कशी पडेल,आणि वंचिताचे राजकारण कसे अपयशी होईल, हे त्यांचे प्रमुख काम आहे. कोणी किती भ्रष्टाचार केला?, गरिबांचे जगण्याचे प्रश्न, रोजगारीचे प्रश्न, महागाई गगनाला भिडली. शिक्षनाचे खाजगी करण केल्यामुळे गरिबांच्या मुलांना शिक्षण घेता येत नाही. मेडिसिन आव्याक्याच्या बाहेर महाग झालं. सर्व जनता या गोष्टीमुळे होरपडून निघत आहे. मात्र दुर्दैव हे की ही परिस्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांना बदलवण्याची मानसिकता ह्या गुलाम असलेल्या मेंदू मधून जात नाही आग लागलेली सर्व जण पाहत पण ती विझवण्यासाठी कोणी प्रयत्न करीत नाही. आणि जे तन मन धनाने प्रयत्न करतात. त्यांच्यावर यांचा विस्वास नाही. म्हणून हे सर्व फक्त आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत नाही. फक्त दुरून गंम्मत पाहत आहे. यांना आस लागत आहे तरी हे बदल स्वीकारत नाही. कारण मानसिकता जातीची, धर्माची,पक्षाची यांच्या मध्ये ठासून भरली आहे. काँग्रेस भाजप ने मुस्लिम,मराठा, धनगर, यांना आरक्षणाच्या नावे हातचे बाहुले करुन ठेवले आहे.ह्यांना फक्त आस्वासन देता. पण त्यांच्या अडचणी सोडवत नाही. सोडवण्याचे नाटकं मात्र करतात. आणि हेच सामाजिक प्रश्न विचारण्याचे कार्य आपल्या मिडीया चे आहे अगदी पण अगदी महत्वाच्या विषयवार सरकार किंवा विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याची एकाही पत्रकारा मध्ये हिम्मत नाही. कारण भारतामधील लोकशाहीचा चौथा स्तंभ हा गुलाम झालेला आहे. त्यामुळे तो सत्ये कथन करीत नाही, तर समाजाच्या अहिताचे काय आहे. कश्यामुळे समाजाचे अहित होईल यांच्या बातम्या जाहिराती ह्या वारंवार दाखवून लोकांना फसविले जात आहे. हे देशाचे सर्वात मोठे दुर्देव आहे.असो पत्रकार हे निपक्ष असतात पण येथे क्वचित एखादा अपवादाणे पत्रकार असेल जो नेहमी सत्याची बाजू घेतो बाकी तर बिन बुडाचे लोटे आहे. तरिही तेजनतेचे नाही म्हणून त्यांच्यावर रोष नाही. असे नाही जे कारणीभूत आहे. दोषी आहेत, ते दोषी आहेतच. पण जे स्वतः ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी समजता ते जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पायमल्ली करुन इतरांना मदत करता तेव्हा त्यांची कीव येते. की यांना कोणत्या प्रकारचे आंबेडकर वादी म्हणावे खरं तर हे *कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ* असे आहेत हे आज जर उद्याच्या पिढ्यांचे नुकसान लक्षात घेणार नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली क्रांती कधीच होणार नाही.म्हणून मला माझे मत मांडवे वाटते की जर चळवळी ला मदत करता येत नसेल तर करू नका. काही फरक पडणार नाही. पण चळवळीचे नुकसान होईल असे पाऊल ही तुम्ही उचलता कामा नये. कारण गेल्या १९६७/६८ सालापासून हे असे नेहमी होत आहे. असे म्हटल्या पेक्षा काँग्रेस भाजप च्या नेत्यांनी आपल्यातील काही बळीचे बकरे हाताशी धरून वंचित बहुजनांचे राजकारण संपविण्याचे कट कार्यस्थान केले व त आजही अविरत सुरु आहे. हे स्वतःला बौध्द म्हणणाऱ्या प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. 

नाही तर एवढ्या अथक परिश्रमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे स्वातंत्र्य दिलं त्या स्वातंत्र्याचा समाजाला काय फायदा ? ह्या अश्या वागणुकीमुळं आपलं अस्तित्व कधी निर्माण होईल.आणखी किती दिवस इतरांची गुलामी करायची? इतरांचे चे गुलाम म्हणून मोठेपण माणण्यात काय अर्थ ? आपल्या मातीवर राष्ट्रवादी काँग्रेस सेना मनसे भाजप किंवा इतर कुणीच येणार नाही. हे कायम लक्षात ठेवा.करिता आता तरी विचार बदलवा.आता जर आपण सावध पवित्रा घेऊन लढलो नाही तर आज वरील सर्व काँग्रेस भाजप ला मदत करणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवा तुम्ही गेल्यावर तुमच्या मुलांना कुणी विचारणार नाही. उदा. गवई साहेब यांचा मुलगा राजेंद्र गवई यांची आजची परिस्थिती काय आहे. हे समजून घ्या. समाजाला आणि आंबेडकर घराण्याला विरोध करणाऱ्या प्रत्येकाणे विचार करुन वागावं.शत्रू कोण मित्र कोण हे ओळखलं पाहिजे. काँग्रेस ने संविधान आणि लोकशाही च्या विषयावर निवडणुका लढून काही अंशी लोकांना फसविले आहे.ते संविधान वाचणार की नाही? तर मुळीच नाही. हे कोण संविधान वाचवणार ? हे फक्त सत्ता आपल्या हाती कशी येईल.... हा विचार करीत असतात .आणि एकदा का, यांना सत्ता मिळाली की यांना 

... संविधानाशी काही घेणे देणे नाही.संविधान वाचविण्याची लढाई कोण लढणार आहे -- काँग्रेस की राष्ट्रवादी सेना की मनसे कोणीच नाही ? आता याविषयी कोणीच काही बोलत नाही. आणि बोलणार सुद्धा नाही. कारण त्यांचा स्वार्थ आपल्यातील काही स्वयंघोषित आंबेडकर वादी समजणाऱ्या लोकां मुळे साध्य झाला आहे. लोकशाही आणि संविधाना च्या नावे वंचितांचे राजकारण मात्र उद्ध्वस्त करण्यासाठी हा खटाटोप राष्ट्रवादी काँग्रेस सेना बीजेपी यांचा कावा आहे.हे आपण विसरता कामा नये.हे मात्र नक्की.

लक्षात घ्या.

आंबेडकरी चळवळ ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय चालणार नाही.

कारण ते स्वाभिमाणाचा निर्भीड,अभ्यासू ब्रँड आहे.

 म्हणून सावध व्हा. आणि वंचित बहुजन आघाडीचे सच्चे. स्वाभिमानी, निष्ठावंत कार्यकर्ता व्हा. नेता व्हा व आपल्या येणाऱ्या पिढ्याचे भवितव्य उज्वल करण्यासाठी मदत करा.नाही तर इतर पक्षावाले तुम्हाला गुलाम म्हणून वागवतील हे मात्र निश्चित आहे.

जयभीम.

विजय झनके 

नेरूळ 



Tuesday, May 28, 2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांचा पंजाब मधील होशियारपुर लोकसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात

🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞🛞

होशियारपूर - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव य आंबेडकर हे त्यांच्या  नुकत्याच स्थापन केलेल्या ग्लोबल रिपब्लिकन पार्टी या पक्षातून गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.  तेथे 1 जूनला मतदान आहे. 

     या पूर्वी सन 1962 साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र भय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर हे या होशियारपूर लोकसभा मतदार संघातून उभे राहिले होते, त्यावेळी ते केवळ 10301 मताने हरले होते. यावेळी त्यांचा मुलगा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ भीमराव यशवंत आंबेडकर जे सन 2014 साली दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्यापासून सार्वजनिक समाज कार्यात सहभागी झाले. त्यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी व समता सैनिक दलाची जबादारी आल्यापासून सर्व देश, विदेशात कार्य सुरु करून भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज इत्यादी सर्व  समतावादी विचाराचे, संविधान संरक्षणाचे काम काम करत आहेत.

      डॉ भीमराव य आंबेडकर हे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव होशियारपूर लोकसभा मतदार संघातून उभे राहिले आहेत, येथे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दलाची शाखा नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा  वाल्मिकी,

रविदासी या समाजाची संख्या जास्त आहे. होशियारपूर लोकसभा मतदारसंघात नऊ विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून,मतदार संघ पुढीलप्रमाणे आहेत. श्री हरगोबिंदपूर (SC),भोलाथ,

फगवाडा (SC),मुकेरियन, दसूया, उर्मर तांडा, शाम चौरसिया (SC), होशियारपूर, चब्बेवाल (SC) या विधानसभा  मतदार संघात स्टार प्रचारक म्हणून भन्ते सुमित रतन,संतोष राणी,ओपी इंदल, सुबचन राम, रेशम कालोह,अनिल बग्गा, डॉ वाय के ठोंबरे, इंद्रजित कालरा, हरदीप कौर, फौजी इंडिया , बाइंडर सरोह, अत्तर सिंग,

हरदवारीलाल यादव, प्रमोद गौतम तसेच दर्शना भीमराव आंबेडकर, चंद्रकला याआहेत. डॉ भीमराव आंबेडकर यांना त्यांच्या खात्यावर दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया / समता सैनिक दलाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध संघटना, आंबेडकरी जनता यांनी जवळ जवळ 14 लाख निवडणूक निधी 500 रुपया पासून जमा केला असून अजून निधीचा ओघ चालूच आहे .

       निवडणूक प्रचाराकरिता वेगवेगळ्या आठ कमिट्या तयार करण्यात आल्या असून गुरमुखसिग खोसला, अशोक बट्टी,संतोष राणी, जितेंद्र खोसला, इंद्रजित कालरा,मोहन सब्रवाल,सुनिल मसिह, बिंदर सरोया, तरसेन दिवाना, कुलजीतसिह खोसला इत्यादी च्या प्रचार समितीच्या माध्यमातून नऊ विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हाचा प्रचार अतिशय जोमाने सुरू आहे.

धम्मयान मीडिया

.


























Friday, May 24, 2024

Seminar and press conference on the special occasion of Buddha Purnima


Hoshiarpur

23/05/2024

Seminar and press conference on the special occasion of Buddha Purnima




Hoshiarpur

23/05/2024




प्रधानमंत्री मोदींच्या राजकीय सभेमुळे हजारो आंबेडकर अनुयायी यांना तब्बल चार तास चैत्यभुमी येथे जाण्यापासून रोखण्यात आले व श्रामनेरी शिबिर सुद्धा खोळंबले

 प्रधानमंत्री मोदींच्या राजकीय सभेमुळे हजारो आंबेडकर अनुयायी यांन


मोदींच्या भेटीची चैत्यभूमी ट्रस्टीला माहिती दिली नाही

मुंबई - भाजपा च्या वतीने दि 17/5/2024 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांची शिवाजी पार्क येथे लोकसभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमाला जाण्यापूर्वी नरेंद्र मोदीजी हे डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी येणार आहेत, याची चैत्यभुमीचे विश्वस्त दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यांना आगाऊ माहिती देण्यात आली नाही.3 त्यामुळे चैत्येभुमी येथे महारष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महिलांचे बुद्ध जयंती व माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त दि 17/5/2024 ते 27/5/2024 या कालावधीत आयोजित केलेल्या श्रामणेरी शिबीराचा उदघाटन कार्यक्रमाला मोठी अडचण निर्माण झाली.चैत्यभुमी येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम आयोजित केला होता शिबिरार्थी महीला, कार्यकर्ते, ट्रस्टी , पदाधिकारी यांना मोदीजींच्या मुळे खुप मोठी झळ सोसावी लागली आहे.तसेच दर्शनाला आलेल्या हजारो लोकांना या सभेमुळे खुप त्रास सहन करावा लागला आहे. कारण मोदीजी यांचे चैत्यभुमी येथे आगमन सायंकाळी सात वाजता झाले आहे.परतुं चैत्यभुमी कड़े येणारा रस्ता बबन प्रभू चौक येथे दुपारी पासूनच बंद करण्यात आला होता.म्हणजें तब्बल लोकांना पांच तास त्रास सहन करावा लागला आहे. दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया चा पुर्व नियोजित कार्यक्रम पाच वाजता सुरू होणार होता.तो कार्यक्रम आठ वाजता सुरू झाला आहे आणि या कार्यक्रमाची पुर्व कल्पना देखील चैत्यभुमीचे विश्वस्त यांना दीलेली नव्हती.त्यामुळे पोलिस प्रशासन यांच्याशी ट्रस्टी संस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे कार्यकर्ते यांची खुप बाचाबाची झाली आहे. रात्री आठ वाजता चैत्यभुमी येथील शिबीर उदघाटन संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुज्य भंते बोधी रत्न यानी सर्वांना त्रिसरण पंचशील नंतर आशिर्वाद दिला व ४७ केंद्रीय शिक्षिकांना श्रामणेरी प्रवज्जा दिली. एस के भंडारे (राष्ट्रीय उपाध्यक्ष व केंद्रीय कार्यालय प्रमुख ) सुषमाताई पवार (राष्ट्रीय उपाध्यक्षा व केंद्रीय महिला विभाग प्रमुख ) बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव ), भारतीताई शिराळ (केंद्रीय महिला विभाग सचिव ), वैशालीताई अहिरे ( मुंबई प्रदेश महिला शाखा अध्यक्ष) यांनी यथोचित मार्गदर्शन केले. या मंगल प्रसंगी राष्ट्रीय सचिव बी एम कांबळे, केंद्रीय महिला विभाग उपप्रमुख रागीणीताई पवार, महाराष्ट्र राज्य महिला शाखा कोषाध्यक्ष सुनंदा ताई वाघमारे, मुंबई प्रदेश शाखेचे कोषाध्यक्ष विलास खाडे, उपाध्यक्ष सुनील बनसोडे, सचिव पंढरीनाथ कांबळे, संघटक महादेव गायकवाड़, मुंबई प्रदेश महिला शाखा कोषाध्यक्ष दिप्ती ताई लोखंडे, उपाध्यक्ष वंदना सावंत, माजी न्यायाधिश व नांदेड़ उत्तर जिल्हा शाखेचे अध्यक्ष डाॅ यशवंत चावरे व माजी न्यायाधिश व बौद्धाचार्य / माजी श्रामणेर डाॅ सोनवणे आणि राज्य / प्रदेश / दोन / जिल्हा शाखांचे अनेक पदाधिकारी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक / शिक्षिका / कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये प्रशासन,पोलीस प्रशासन आणि संबंधीत यंत्रणेचा जाहीर निषेध व्यक्त करून, सामान्य माणसांना राजकीय कार्यक्रमासाठी अशा पध्दतीने वेठीस धरू नये, असा ठराव करण्यात आला. या शिबिरात एकूण 47 महिलांनी सहभाग घेतला आहे. या महिलांनी केस मुंडन करून आपल्या कुटुंबाचा 10 दिवस त्याग केला आहे. शिबिराचा समारोप माता रमाई यांचे माहेर वणंद (दापोली ) येथे होणार आहे. उदघाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ अॅड एस एस वानखडे होते व सूत्रसंचालन केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या सचिवा सुनंदाताई पवार यांनी केले.

बी एच गायकवाड (राष्ट्रीय सचिव )

अनिल मनोहर (सचिव, केंद्रीय प्रशीक्षण विभाग)

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया






ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...