Wednesday, April 12, 2023

आरक्षण व संविधान विरोधकांना मतदान न करण्याचा ठराव.



मंत्रालयावर आरक्षण हक्क कृती समितीचे  प्रचंड आक्रोश धरणे आंदोलन संपन्न

आरक्षण व संविधान विरोधकांना मतदान न करण्याचा ठराव.

 आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने  सर्व मागासवर्गीय संघटनांनी  महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती दिनी दि 11/4/2023 रोजी महात्मा फुले , छत्रपती शिवाजी महाराज , राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून खाजगीकरणाचा व ज्यात आरक्षण नसलेला दि.14/3/2023 चा काढलेला शासन निर्णय  तात्काळ रद्द करावा ,मा.सर्वोच्य न्यायालयाने दि 28/1/2022 रोजी आदेश दिले असून  त्या अनुषंगाने केंद्र सरकारने (डीओपीटी) दि 12/4/2022 रोजी निर्देश देऊन सुद्धा सरकारने पदोन्नतीतील आरक्षण न देणे,जुनी पेन्शन योजना सर्व निम सरकारी महामंडळे /प्राधिकरण यांसह  सर्वाना सुरू करणे ,सरकारने नेमलेल्या समितीने तीन महिन्यातच अहवाल द्यावा , नवीन संसद भवनला डॉ बाबासाहेब आंबेडकर संसद भवन नाव द्यावे ,नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षण ठेवावे , बार्टीच्या 862 विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती घ्यावी ,बेरोजगाराना 15 हजार बेरोजगार भत्ता द्यावा,

मागासवर्गीयांच्या   वरील अन्याय अत्याचारबाबत प्रत्येक  तालुका स्तरावर न्यायालय करावे  इत्यादी विविध 20 मागण्यांसाठी   सर्व मागासवर्गीय - बहुजन संघटनांचे  आयबीसेफच्या पुढाकाराने  मंत्रालयावर आझाद मैदान येथे  प्रचंड जन आक्रोश धरणे आंदोलन करण्यात आले व त्यामध्ये संविधान प्रास्ताविकेची व  आरक्षण विरोधी - संविधान विरोधकांना मतदान न करण्याची सामुहिक शपथ घेण्यात येऊन 

सरकारने मागण्याची दखल घेतली नाही तर पुढील रस्त्यावरचे प्रचंड जन आक्रोश आंदोलन स्वातंत्र्याच्या दिनी - दि 15/8/2023 रोजी करण्यात येईल असे ठरविण्यात आले.या आंदोलनात आरक्षण हक्क कृती समितीचे  राज्य निमंत्रक अनुक्रमे मा. हरिभाऊ राठोड (माजी खासदार-एस सी एस टी ओबीसी संघटना ),

 मा.सुनिल निरभवने ( केंद्रीय अध्यक्ष आयबीसेफ - कास्टट्राइब राज्य परिवहन ), मा.एस के भंडारे (  केंद्रीय सरचिटणीस ,आयबीसेफ -म्हाडा गृहनिर्माण ),मा .सिद्धार्थ कांबळे (खजिनदार,आयबी सेफ - सेंट्रल रेल्वे युनियन ) जगदिश गायकवाड ( महापालिका शिक्षक संघटना ) , आर डी सोनकर (खाटिक समाज संघटना ), प्रा डॉ महिंद्र  दहिवले ( ठाणे निमंत्रक - बिदाता ), इत्यादीनी मार्गदर्शन केले, सूत्र संचालन एस के भंडारे आणि  आभार प्रदर्शन दिपक मोरे ( मुंबई निमंत्रक -मुंबई विद्यापीठ) यांनी केले .या धरणे आंदोलनात  राज्य परिवन , म्हाडा ,बी एम सी शिक्षक,मुंबई विद्यापीठ  ,  इंडियन ऑइल, समता सैनिक दल , परिसंघ , शासकीय मुद्रणालय ,  बीदाता  प्राध्यापक संघटना,बेस्ट  इत्यादी विविध संघटनांचे पदाधिकारी , प्रतिनिधी मोठ्या संख्येने  उपस्थित होते.असे आरक्षण हक्क कृती समिती राज्य समन्वयक व आयबी सेफचे केंद्रीय सरचिटणीस एस के भंडारे यांनी कळविले आहे.














Tuesday, April 11, 2023

सिगाल सुत्त

 



दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा मुंबई प्रदेश च्या वतीने चैत्यभूमी दादर येथे श्रामनेर शिबिर आयोजित केले आहे. दिनांक १० एप्रिल २०२३ रोजी आयुष्यमान राजेश पवार राष्ट्रीय सचिव यांनी सिगल सत्ता हा विषय पुढील प्रमाणे सांगितला.

                  सिगाल सुत्त

  सिगाल सुत्त गृहस्थांची आचारसंहिता कथन करणारे अत्यंत महत्वाचे सुत्त आहे. या सुत्तात बुद्धाने सिगाल या गृहस्थाला सहा दिशांची पूजा करण्याऐवजी, आईवडिल, शिक्षक, पत्नी व मुले, मित्र आणि सहकारी, मजूर आणि चाकर आणि धम्मशिक्षक यांचा आदर व सन्मान करण्याची सूचना केली.

 हे सुत्त म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीने आईवडिल, पत्नी व मुले, मित्र आणि सहकारी, चाकर व मजूर आणि धम्मशिक्षक यांचेशी वर्तन करण्याची योग्य पद्धत कोणती. हे शिकविते.


 "एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनातील कलंदनिवासात विहार करीत होते.

 त्या समयी एका गृहस्थाचा सिगाल नावाचा तरूण पुत्र प्रातःकाळी उठून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर वर, खाली अशा रीतीने  सर्व दिशांची पूजा करू लागला.

 त्याच वेळी सकाळी भगवंतांनी चीवर परिधान करून, चीवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. सहा दिशांची पूजा करणारा सिगाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, 'तू दिशांची  पूजा का करीत आहेस?"

त्यावर सिगालाने उत्तर दिले, 'माझे वडिल मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले की, 'मुला, तू आकाश-पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. 'वडिलांच्या आशेचा मान राखण्यासाठी, भगवान, भी अशा रीतीने पूजा करीत आहे. ' 

भगवान बुद्धांनी त्यास विचारले की तुला सहा दिशांची पूजा करणे याचा अर्थ माहित आहे का? सहा दिशांची पूजा कोण करू शकतो हे तुला माहित आहे काय?

 सिगालाने उत्तर दिले, 'सहा दिशांची पूजा कोण करू शकतो आणि कशी करावी याविषयी कृपया मला सांगावे.

 'तरूण गृहस्था, ऐक: मी तुला सहा दिशांची पूजा कशी करावी आणि सहा दिशांची पूजा करण्यास कोण लायक असतो याविषयी सांगतो. ' तरुण सिगाल म्हणाला, 'ठीक आहे.' मग भगवंत म्हणाले:

चार प्रकारचे कर्म कलेश चार प्रकारचे पाप कृत्य आणि सहा प्रकारची संपत्ती नाशाची कारणे यापासून अलिप्त असणारी व्यक्ती तीच सहा दिशांची पूजा करण्यास लायक असते.

चार प्रकारचे कर्म क्लेश

 'माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकविले पाहिजे. 

(१)जीवहत्या करणे,  

(२) न दिलेले बलात्काराने घेणे, 

(३) व्यभिचारी करणे आणि 

(४)असत्य बोलणे, 

हे चार दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. '

चार प्रकारचे पापकर्म घडून येण्याचे चार हेतु

 'सिगाल हे लक्षात ठेव की, पापकर्म ही   

 (१)पक्षपातीपणा, 

(२)शत्रुत्व, 

(३)मूर्खपणा आणि

 (४)भय 

यामुळे घडतात, यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही.'

 संपत्तीच्या उधळपट्टीचे सहा मार्ग

 'माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकविले पाहिजे.

 (१)मद्यपानाचे व्यसन, 

(२)अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे.

( ३)जत्रांतून परिभ्रमण करणे,

 (४)जुगाराची सवय जडणे,

 (५)कुमित्रांची संगत धरणे आणि

 (६)आळशी सवयी अंगी लावून घेणे, 

यांमुळे संपत्तीची धूळधाण होते.'

मद्यपानाच्या सवयीमुळे उद्भवणारी सहा संकटे

 ‘मद्यपानाच्या सवयीने सहा प्रकारची संकटे उद्भवतात. (१)संपत्तीचा खराखुरा नाश

, (२)वाढती भांडणे.

 (३)रोगाधीनता,

 (४)शीलभ्रष्टता,

 (५)अश्लील वर्तणूक आणि 

(६)बुद्धीनाश

 ही सहा संकटे होत. '

अवेळी रस्त्यांवरून भटकण्यामुळे उद्भवणारी सहा संकटे

 'अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो. ती म्हणजे 

(१)तो स्वतः,

२) त्याची बायकामुले आणि

 ३)त्याची मालमत्ता ही अरक्षित राहतात.

 ४) त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्यांचा तपास लागला नाही, त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. 

५) खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि

 ६) त्यांना तोंड देण्यास त्याला पुष्कळ त्रास सोसावा लागतो. '

 जत्रेत भटकण्यामुळे उद्भवणारी सहा संकटे

. 'जत्रेत भटकल्याने तो सहा प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की

,१) नाचणे, २)गाणे,३) बजावणे,४) काव्य गायन, ५)झांजा,६) ढोलकी कुठे वाजत आहेत का?

 जुगारावर मोहीत होण्यामुळे उद्भवणारी सहा संकटे

 ‘जुगाराने मोहीत होणा-यांवर येणारी सहा संकटे म्हणजे, १)खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात

२) हरला तर द्रव्यनाशाबद्दल तो स्वतः शोक करतो.

३) त्याच्याजवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते,

४) न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही,

५) त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात.

६) लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. कारण लोक म्हणतात, जुगा-याला बायकोचे पालनपोषण कसे करता येणार?”

 कुसंगतीमुळे ओढवणारी सहा संकटे

 'कुसंगतीने सहा प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही 

१)जुगारी,  २) व्यभिचारी,  ३) दारूबाज, ४ ) लबाड,  ५) पैसे खाऊ आणि ६) हिंसक मनुष्याची मैत्री जडते. '

 आळशीपणाच्या सवयीमुळे ओढवणारी सहा संकटे

. 'आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी सहा संकटे म्हणजे, 

१) तो म्हणतो, आता फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही. 

२) आता फार गरमी आहे म्हणून काम करीत नाही,

३)  अद्यापि अवकाश आहे किंवा

 ४) आता फार उशीर झाला, म्हणून मी काम करीत नाही; तो म्हणतो, 

५) फार भूक लागली आहे म्हणून काम करीत नाही. 

६) तो म्हणतो, हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही. 

आणि अशा रीतीने जे करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. '

चार प्रकारचे कर्मकेश चार प्रकारचे पाप कृत्य आणि सहा प्रकारच्या संपत्ती नाशाची कारणे यापासून तुम्ही अलिप्त असाल तर तुम्हाला खऱ्या मित्राची पारख करता येते.

 ख-या मित्राची पारख

'व्यवहारी माणसाच्या धर्माने ख-या मित्राची पारख करण्यास त्याला शिकविले पाहिजे.'

'मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तूतः शत्रू असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत. 

१)लोभी पुरूष, 

२)बोलघेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, 

३)खुशामत्या पुरूष आणि

 ४) उधळ्यावृत्तीचा पुरुष,

 मित्रासारखे वाटणारे चार प्रकारचे शत्रू

'यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो, परंतु आतून तो शत्रुसारखा वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो. परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो. '

जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे, असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी साहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो.'

खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्ये करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो, परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. '

'त्याचप्रमाणे उधळ्यासोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रत्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो. तुम्ही द्यूतक्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो.'

मनःपूर्वक मैत्री करणारे चार मित्र

 'मनःपूर्वक मैत्री करणारे चार मित्र असतात. १) सहाय्यक,२)  सुख-दुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, ३) सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि ४) सहानुभूती दाखविणारा. '

 'सहाय्यक हा खरा मित्र समजावा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिथे संरक्षण करतो, तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो, तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की, ते तुम्हाला दुपटीने पुरवितो. ' तुम्हाला ज्याची गरज असेल

'सुख दु:खा मध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो.

 'तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही, अशा चार गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो. '

 'तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो. सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणा-यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणा-यांची तो प्रशंसा करतो,' असे भगवंत म्हणाले. 

‘जो धम्म मानवधम्म आहे, तो मानवाला षड्दिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकरचाकर आणि धम्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो. '

पुत्रांसाठी विनय

मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की. माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालविली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडिल मुलावर प्रेम करीत असतात, दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात. सद्गुणाचा त्याला उपदेश करतात. आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात. त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात."म्हणजेच तुम्ही पूर्व दिशेची पूजा केली असे समजावे.

 शिष्यांसाठी विनय

शिष्याने पुढीलप्रमाणे आपल्या गुरूची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा. त्यांना अभिवादन करावे. त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरू शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्याचे ज्ञान गुरू अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्याशी त्याच्यासंबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व त-हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात.” म्हणजेच तुम्ही दक्षिण दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.

 पती-पत्नीसाठी विनय

 “पतीने आपल्या पत्नीचा सन्मान राखून, आदरभाव प्रदर्शित करून, तिजशी एकनिष्टतेने वागून, तिला सत्ता देऊन, तिला लागणारे दागदागिने पुरवून, तिची सेवा करावी. कारण पत्नी त्याच्यावर प्रेम करते, ती सासर- माहेरच्या नातलगांचे आदरातिथ्य करून आपले कर्तव्य बजाविते, ती पतिव्रत्याने वागते, आपल्या नव-याच्या उपार्जित धनावर दक्षतापूर्वक लक्ष ठेवते, आणि उद्योगाने आणि कुशलतेने आपली कर्तव्ये पाळते.” म्हणजेच तुम्ही पश्चिम दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.


 “कुलपुत्राने औदार्याने, दाक्षिण्याने, दानधर्माने आपल्या मित्रांची आणि सहका-यांची सेवा करावी.आपल्यासारखेच त्यांना वागवावे, आणि आपण स्वतः त्यांना दिल्या शब्दाप्रमाणे वागावे. कारण त्याचे मित्र आणि परिचित त्यांच्यावर प्रेम करतात. तो गैरसावध असताना त्याचे व त्याच्या मालमत्तेचे रक्षण करतात. संकटात ते त्याला आधार देतात. त्याच्या आपद्भवस्थेत त्याग करीत नाहीत, आणि परिवाराच्या हिताला जपतात."म्हणजेच तुम्ही उत्तर दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.

धनी व सेवक यांसाठी विनय“

धन्याने नोकर-चाकरांना पुढीलप्रमाणे वागवावे. त्याने त्यांच्या सामर्थ्यांप्रमाणे त्यांना काम द्यावे अत्र व मजुरी द्यावी. ते आजारी पडले असतांना त्यांची शुश्रूषा करावी, असाधारण स्वादिष्ट पक्वान्नं त्यांनी वाटून खावी. वेळ पडेल तेव्हा त्यांना रजा द्यावी. कारण नोकर-चाकर हे धन्यावर प्रेम करतात. ते त्याच्यापूर्वी उठतात, आणि त्याच्यानंतर झोपतात. त्यांना जे द्यावे त्यात ते समाधान मानतात. ते आपले काम चोख बजावतात आणि धन्याची किर्ती सर्वत्र वाढवितात. "म्हणजेच तुम्ही खालच्या दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.

“कुलपुत्राने आपल्या धम्मगुरूची सेवा काया-वाचा-मनसा, त्याजवर प्रीती करून, आपल्या घराचे दार त्यांना सदैव मोकळे ठेवून व त्यांच्या ऐहिक गरजा भागवून करावी, कारण धम्मगुरू आपल्या शिष्याला दुष्कृत्यापासून पराड़ मुख करतात, त्याला सन्मार्गाचा उपदेश करतात. मायेने त्यांच्यासंबंधी विचार करतात. जे पूर्वी कधी कानी पडले नाही ते शिकवितात आणि पूर्वी जे कानी पडलेले असते ते चूक असेल तर त्याची सुधारणा करतात. म्हणजेच तुम्ही वरच्या दिशेची पूजा केली असा अर्थ होतो.

. भगवंतांनी सिगालाला वरीलप्रमाणे उपदेश केल्यावर तो म्हणाला, “सुंदर! फार सुंदर! एकदा स्थानभ्रष्ट झालेली वस्तू ज्याप्रमाणे परत स्थानावर बसवावी, किंवा जे गुपीत होते ते उघड करावे किंवा पथभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा काळोखात दीप लावावा आणि डोळे असतील त्यांना सन्मार्ग दाखवावा, अगदी त्याप्रमाणे भगवंतांनी मला अनेक रीतीने सत्य विशद करून सांगितलेले आहे.

  “मी भगवंतांना, त्यांनी सांगितलेल्या धम्माला आणि संघाला शरण जातो.आजपासून आमरण शरण आलेल्या या उपासकाचा स्वीकार करावा. तथागताच्या प्रवचनाअंती सिगाल अत्यंत आनंदी झाला आणि तो बुद्ध, धम्म, आणि संघाला शरण गेला. त्याने तथागताला आपला शिष्य करून घेण्याची विनंती केली.

Friday, April 7, 2023

आदरणीय जगदीश गवई साहेब धम्म रत्न पुरस्काराने सन्मानित.

आदरणीय जगदीश गवई साहेब धम्म रत्न पुरस्काराने सन्मानित.


बुलढाणा जिल्हा उत्तरचे सन्माननिय अध्यक्ष व कार्यकारीणीचे सर्व पदाधिकारी, आणि सर्व कार्यकारिणीने दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी मोताळा येथे संपन्न झालेल्या भव्य धम्म परिषदेत प्रमुख मार्गदर्शक स॑स्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते आदरणीय जगदीश गवई साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष (जम्मू काश्मीर, लेह लद्दाख, पंजाब, मेघालय व पश्चिम बंगाल चे प्रभारी )यांना धम्म रत्न पुरस्कार व शाल देवून त्यांचा सन्मान केला

त्यांनी केलेल्या  गेल्या 24 वर्षाच्या धम्म प्रचार व प्रसार कार्याचा जो गौरव केला त्या बद्दल आदरणीय जगदीश गवई साहेब यांनी बुलढाणा जिल्हा कार्यकारीणीचे मन:पुर्वक आभार व्यक्त केले. 






Thursday, April 6, 2023

इंदू मिलच्या राष्ट्रीय स्मारकात बसविण्यात येणाऱ्या भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ३५० फूट उंच पुतळ्याची पाहणी केली.

 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी आज दिनांक 6 एप्रिल 2023 रोजी , उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद येथे तयार होत असलेली इंदू मिलच्या राष्ट्रीय स्मारकात बसविण्यात येणाऱ्या भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची ३५० फूट उंच पुतळ्याची पाहणी केली.






Inspected the 350 feet tall statue of Bharatratna Bodhisattva His Holiness Dr. Babasaheb Ambedkar to be installed in the Indu Mill National Memorial.

Honorable Dr. Bhimrao Yashwant Ambedkar Saheb, National Working President of The Buddhist Society of India today, on 6 April 2023, installed the Bharat Ratna Bodhisattva His Holiness Dr. Inspected the 350 feet tall statue of Babasaheb Ambedkar.

Wednesday, April 5, 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त नात सुनेने वाटले लाडू.

 आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. या दिनाचे औचित्य साधून चैत्यभूमी दादर येथे मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

आज दिनांक 4 एप्रिल 2023 रोजी मुंबई प्रदेश शाखेच्या वतीने आयोजित श्रामनेर शिबिराचे उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी केले.

 याप्रसंगी संस्थेचे ट्रस्टी चेअरमन आदरणीय डॉक्टर हरेश रावलिया साहेब उपस्थित होते. तसेच संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आदरणीय एस. के. भंडारे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय बी .एच. गायकवाड साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि प्रशिक्षण विभागाचे प्रमुख आदरणीय एस .एस .वानखडे साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय राजेश पवार साहेब, संस्थेचे राष्ट्रीय सदस्य आदरणीय एम .डी . सरोदे  तसेच महाराष्ट्र राज्य शाखेचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष आदरणीय रवींद्र इंगळे साहेब उपस्थित होते.

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांच्या नात सुनेने म्हणजेच दर्शनाताई भीमराव आंबेडकर यांनी उपस्थितांना लाडू देऊन सर्वांचे तोंड गोड केले.

भंते सुमेध बोधी यांनी 50 उपासकांना श्रामणेरची दीक्षा दिली.

मुंबई प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय उत्तम मगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली श्रामणेर शिबिराचा  उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुंबई प्रदेश शाखेचे सरचिटणीस आदरणीय रवींद्र गवई साहेब यांनी केले.

























Sunday, April 2, 2023

संविधान उध्वस्त करू पाहणारे सरकारच उध्वस्त करा. -डॉ भीमराव यशवंत आंबेडकर

 संविधान उध्वस्त करू पाहणारे सरकारच उध्वस्त करा.

  -डॉ भीमराव यशवंत आंबेडकर

 मुंबई (30/3/2023): सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यानी आमच्या  महापुरुष्यांचा आपण केला ते सहन न झाल्यामुळे समता सैनिक दलाचे सैनिक मनोज गडबडे यांनी त्या मंत्र्यास अद्दल घडवली व यापुढे आमच्या महापुरुष्यांचा अपमान सहन करणार नाही असा   ईशाराही त्यांनी दिला. आंदोलनास सहभागी व पाठिंबा देणाऱ्यांच्या   सन्मान व सलामी देण्यासाठी  पहिल्यांदाच समता सैनिक दलाच्या 96 व्या वर्धापन दिनानिमित्त  पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात हेलिकॉप्टर मधून डॉ बाबासाहेब पुतळा व उपस्थित हजारो जनतेवर पुष्पव्रष्टी माझ्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने जनता उपस्थित  होती. यावरून असे दिसते की आता समाज जागृत होत आहे. विविध जिल्ह्यातील  धम्म मेळाव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला असून  धम्माच्या माध्यमातून एकत्र येऊन  येणाऱ्या काळात उत्पन्न होणाऱ्या समस्यावर, अडचणीवर आपण मात करू शकतो  असे प्रतिपादन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव य  आंबेडकर यांनी भारतीय बौद्ध महासभेच्या  ईशान्य मुंबई जिल्ह्याच्या (झोन 6)वतीने आयोजित केलेल्या माता रमाई यांची 125 वी जयंती, धम्म दीक्षा व महाधम्म मेळाव्यात दिवंगत हरिषचंद्र मैदान , पवई येथे केले .पुढे ते म्हणाले की बाबासाहेबांची धम्म क्रांती अधिक गतिमान करण्यासाठी आपण ती धम्म क्रांती एका समाजापूर्ती सीमित न ठेवता त्याच्या कक्षा वाढवाव्या लागतील. कारण आता बौध्द धम्मामध्ये ओबीसी, मातंग , चर्मकार समाज आकर्षित होत आहे. त्याचे कारण त्यांच्या मध्ये आता या धम्म मेळाव्यामुळे अशी चर्चा होत आहे की पूर्वाश्रमीचा महार समाज बोद्ध झाला व त्यांच्यामध्ये धम्मामुळे अवघ्या 60-65 वर्षामध्ये  अमूलाग्र बदल होऊन प्रगती झाली व ते पुढे गेले आम्ही मात्र मागे राहिलो कारण आमच्या पूर्वजानी चूक केली की त्यानी बौद्ध धम्म घेतला नाही. हिंदू धर्म व्यवस्थेमध्ये आपली प्रगती होणार नाही. आपण अंधश्रध्येमध्येच गुरफुटून राहू अशा प्रकारच्या परिवर्तन वादी विचारांची चर्च्या त्यांच्या मध्ये होत आहे. त्याची सुरुवात म्हणून येणाऱ्या 9 एप्रिल,2023 रोजी मातंग समाजाचे 100 कुटुंब डॉ आंबेडकर भवन, पुणे येथे बौध्द धम्म स्वीकारणार आहेत. त्याचे कारण त्यामध्ये एकंदरीत डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक व वकील यांचा समावेश आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.यावेळी ते असेही  म्हणाले की ,राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांनी भारत देशामध्ये 84000 हजार स्तुपाची निर्मिती करून भारत देशामध्ये खऱ्या अर्थाने दुसऱ्यांदा धम्म चक्र अनुप्रवर्तन करून बौद्ध धम्म पुनर्जिवीत केला व देशामध्ये कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. लोकांभीमुख योजना आखल्या.समता प्रस्थापित केली.तो बौध्द धम्माचा सांस्कृतिक वारसा म्हणजे विहार, लेणी, स्तूप, चैत्य याचे जतन, संवर्धन व संरक्षण  करणे बौद्ध म्हूणन आपले नैतिक कर्तव्य आहे. म्हणून भारतीय बौद्ध महासभा व लेणी संवर्धन समिती यांच्या  संयुक्त विद्यमाने 'लेणी बचाव'अभियान गेली दोन वर्ष राबवले जात आहे. त्याचाच भाग म्हणून  प्रत्येक लेणीच्या अग्रभागी लेणी माहिती फलक लावण्याचे व लेणीवरील अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेतलेले आहे.  यापुढे आपण सांस्कृतिक वारसा जपून ठेवण्यासाठी समाजातील तरुण वर्गाणी समता सैनिक दलामध्ये मोठया संख्येने भाग घ्यावे व  यापुढे राजा चक्रवर्ती सम्राट अशोक यांची जयंती सुद्धा मोठया प्रमाणावर साजरी केली पाहिजे.असे आवाहन त्यानी उपस्थितांना केले. बाबासाहेबाच्या धम्म क्रांतीला सत्तेमधील असलेले सरकार दाबण्याचा प्रयत्न करीत आहे.कारण त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभा राहतो की या समाजाने शून्यापासून सुरुवात केली आणि हा समाज 60-65 वर्षांमध्ये पुढे गेला कसा? त्यावर ते विचार करतात आणि त्याचे कारण आहे संविधान. संविधानातील तरतुदीमुळे हा समाज शिकला.म्हणून  संविधानच बदलण्यासाठी ते तयार आहेत. त्यांचे संविधान तयार आहे. त्यांनी शिक्षण महाग केले आहे.सरकारी कंपन्या विकल्या जात आहेत. जर सरकारी कंपन्याच नसतील तर आरक्षण देणार कुठून? अशा प्रकारचे षढयंत्र रचले जात आहे.संविधान उध्वस्त करणारे सत्तेत बसले आहेत.त्यामुळे प्रगतीचा मार्ग रोखला जाणार. म्हणून बाबासाहेबानी आपल्याला अगोदरच म्हणजे 14 ऑक्टोबर,1956 सालीच धोके सांगितलेले  आहेत. प्रत्येक क्रांतीच्या मागे प्रतिक्रांती असते. येणाऱ्या काळामध्ये गंभीर समस्यांचा सामना आपणास करावा लागणार आहे.त्यामुळे आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत.अजिबात हार मानणार नाही. आपण असा निर्धार करू या की बाबासाहेबांची धम्म क्रांती आम्ही पुढे घेऊन जाऊ. हे सर्व करण्याकरिता बाबासाहेबानी आपल्याला मतदानाचा हक्क दिला आहे. 2024 हे वर्ष हे फार कठीण (Crucial ) असणार आहे.म्हणून संविधान उध्वस्त करू पाहणारे सरकारच उध्वस्त करून टाका व संविधान मानणाऱ्या लोकांनाच येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सुरवातील धम्म रथातून रॅली   काढण्यात आली .पहिल्या सत्रामध्ये 'बौद्ध धम्माची खास वैशिष्ट्ये 'या  विषयावर संस्थेचे राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी व दुसऱ्या सत्रा मध्ये राष्ट्रीय सचिव तथा केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ऍड एस. एस. वानखडे यांनी 'डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती गतिमान करणे 'या विषयावर सखोल व मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांनी सुद्धा उपस्थितांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमामध्ये संस्थेचे ट्रस्टी कॅप्टन प्रवीण निखाडे,राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे, जगदीश गवई,राष्ट्रीय सचिव बी. एम. कांबळे, मुंबई प्रदेशचे अध्यक्ष उत्तम मगरे, सरचिटणीस रवींद्र गवई व केंद्रीय सदस्य भरत गायकवाड हे प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  ईशान्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष एल.वाय. घोडेराव यांनी भूषविले व सूत्रसंचालन दयानंद बडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाखेचे कोषाधक्ष मधुकर निरभवणे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमास ईशान्य मुंबई जिल्हा अंतर्गत सर्व शाखेचे पदाधिकारी, उपासक, उपासिका व जनसमुदाय  प्रचंड संख्येने उपस्थित होता.







Saturday, April 1, 2023

महाराष्ट्र केसरी उपविजेती कुमारी वैष्णवी पाटील यांचे हार्दिक अभिनंदन

 ठाणे जिल्ह्या अंतर्गत असणाऱ्या अंबरनाथ तालुक्यातील मांगरूळ गावची सुकन्या कुमारी वैष्णवी पाटील  कुस्ती या खेळामध्ये महाराष्ट्र केसरी उपविजेती झाल्याबद्दल जिल्हा परिषद केंद्रशाळा, मांगरूळ शाळेच्या वतीने त्यांचे दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी हार्दिक स्वागत करण्यात आले.













ग्राम जालूकी में आयोजित हुआ एक दिवसीय बौद्ध कार्यकर्ता प्रशिक्षण शिविर

  डीग/अलवर, 24 मई 2026 दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा उत्तरी राजस्थान की जिला शाखा डीग के तत्वावधान में ग्राम जाल...