आता बुद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
'आता बुद्ध धर्माची लाट आली तर ती कधीही परत जाणार नाही .धर्म स्थापनेसाठी देवळांची अत्यंत आवश्यकता आहे. परंतु आपल्या स्वकष्टाने मला एक असे देऊळ बांधावयाचे आहे की जे तुम्ही कधी पाहिले नसेल. पण त्याकरिता मी कोणा धनिका पुढे लाचार होऊन हात पसरणार नाही. आपल्या स्वपराक्रमाने बांधील दुसर्याच्या ओंजळीने बांधणार नाही" डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी दि. २४मे १९५६ ला नरेपार्क, मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून वरील प्रमाणे भाषण केले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाचा धागा पकडुन दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा यवतमाळ तर्फे बोधिसत्व बुद्धविहाराच्या निर्मिती साठी 3640 स्के.फुटाचा प्लाॅट 728000/₹ (सात लाख अठ्ठाविस हजार ) रूपयांत खरेदी केला. आज या प्लाॅटची किंमत एक करोड रूपये आहे. यवतमाळ जिल्हा शाखे तर्फे आतापर्यंत 70,00000/₹ ( सत्तर लाखाचे ) बांधकाम केले असुन या बांधकामाची आजची किंमत एक कोटी रूपये आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आता पर्यंत तीन स्लॅब पुर्ण झाले. त्यासोबत विट जुडाईचे काम /एक हाॅल संडास बाथरूम मध्ये टाईल्स फिटीं...